Breking News
Pune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूकPune Crime News : पैसे परत मागितल्याने तरुणावर कोयत्याने वारPune Bank Loan Fraud : जय भवानी सहकारी बँकेत साडेचार कोटींचा कर्ज घोटाळा

दीनानाथ रुग्णालयाबाहेर शरद पवार गटाचे आंदोलन…

गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी शरद पवार गटाकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर चिल्लर फेकून आंदोलन

Marathinews24.com

पुणे –भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिशा भिसे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासना कडून उपचारासाठी पैशांची अडवणूक केल्याने गर्भवती तनिशा यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला आहे.या घटनेची माहिती माध्यमातून समोर आल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाबाबत संतप्त प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य सरकारमार्फत समिती देखील नेमण्यात आली आहे.

मागील दोन दिवसांपासून रुग्णालयाबाहेर विविध संघटनामार्फत आंदोलन करीत निषेध नोंदविला जात आहे.तर आज शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालय प्रशासनावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करीत यावेळी चिल्लर फेकून निषेध नोंदविला.तसेच काल पतितपावन संघटनेकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या फलकाला काळे फासून निषेध नोंदविला होता. त्यामुळे आज रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी नावाचा फलक काढून टाकला.
यावेळी प्रशांत जगताप म्हणाले, राज्य सरकारकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालय ट्रस्ट ने जमीन घेतेवेळी रुग्णांना अगदी माफक दरात उपचार केले जातील,असे सांगितले.पण ट्रस्ट ने राज्य सरकार चे नियम पाळले नाहीत.तर प्रत्येक रुग्णांकडुन लाखो रुपये उकळले जातात हे आजवर समोर आले आहे.आम्ही त्या विरोधात वेळोवेळी आवाज उठवला आहे.पण दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कोणत्याही प्रकाराची कारवाई झाली नाही.त्याच दरम्यान पुन्हा एकदा रुग्णांची पैशांची अडवणूक केल्याची घटना समोर आली असून त्यामध्ये एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे.त्यामध्ये जबाबदार असणार्‍या डॉक्टरांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी आणि राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन न केल्याने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची जमीन राज्य सरकारने ताब्यात घ्यावी,अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×