Breking News
शेतात कापूस वेचणाऱ्या विवाहितेचा विनयभंगमुख्यमंत्र्यांनी दावोस मधून अनुभवला भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय सायकलिंग ‘ग्रँड टूर’चा थरारपुणे ग्रँड टूरच्या निमित्ताने शहराच्या भिंती झाल्या ‘बोलक्या’; भिंतींवर साकारला क्रीडा आणि संस्कृतीचा वारसा!बजाज पुणे ग्रँड टूरच्या माध्यमातून पुणेकरांनी अनुभवला वेगवान थरारपुणे उत्तर मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला खिंडारलढाई संपली आता सर्वजण एकत्र येऊ… आपल्या औंध बोपोडीला विकासात अग्रेसर ठेऊ !!!पिस्तूल बाळगणाऱ्या सराईताला बेड्यामनी लॉड्रींगच्या धमकीने महिलेला गंडाकुख्यात घायवळ टोळीविरूद्ध ६ हजार ४५५ पानांचे दोषारोपपत्रजेष्ठाची सायबर चोरट्यांकडून तब्बल २२ कोटींची फसवणूक

कल्याणीनगरमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय

मसाज पार्लर व्यवस्थापकासह दोघांना अटक

marathinews24.com

पुणे – कल्याणीनगर भागात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय पोलिसांनी उघडकीस आणला. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी मसाज पार्लर व्यवस्थापकासह दोघांना अटक केली. मोतीबर समसुलहक रेहमान (वय ३१, रा. संजय पार्क, विमाननगर,मूळ रा. आसाम), अब्दुल मोनुउद्दीन आवाल (वय १९, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलीस शिपाई बालाजी सोगे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केज भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक एसीबीच्या जाळ्यात – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणीनगर भागातील एका संकुलात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती येरवडा पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी मसाज सेंटरमधून तरुणींना ताब्यात घेण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान,पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्ग, तसेच बाणेर भागातील एका लाॅजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा प्रकार पोलिसांनी नुकताच उघडकीस आणला. त्यानंतर कोंढव्यातील एका मसाज सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी तरुणींची सुटका केली. याप्रकरणी मसाज सेंटरच्या चालकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेले गैरप्रकाराच्या तक्रारी पोलीस आयुक्तांकडे करण्यात आल्या. त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांवर कारवाईचे आदेश शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×