Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

केज भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक एसीबीच्या जाळ्यात

केज भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक एसीबीच्या जाळ्यात

जमिन मोजणीची फाईल निकाली काढण्यासाठी १० हजार रुपयांची घेतली

marathinews24.com

बीड : (अनंत जाधव) – शेत जमीन मोजणीची फाईल निकाली काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून ३० हजार रुपयाची मागणी करत १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २९ डिसेंबरला रंगेहात पकडले. कारवाई छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या जालना आणि बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.

शासकीय योजनेतील कर्ज उदिष्ट बँकांनी जानेवारी अखेर पूर्ण करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी – सविस्तर बातमी 

केज उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेले लिपिक माणिक अण्णासाहेब वाघमारे (वय ५०) याने तक्रारदार शेतकरी त्यांच्या जमिनीच्या हद्द कायम मोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. आरोपी माणिक वाघमारे याने दि. १८डिसेंबरला जमीनीची मोजणी केली होती. या मोजणीनुसार क्षेत्राची घट न दाखवता फाईल निकाली काढण्याच्या मोबदल्यात लिपिकाने तक्रारदाराकडे तब्बल ३० हजार रुपयांची मागणी केली.तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार सोमवारी दि. २९ डिसेंबरला पडताळणी केली. त्याने ५ हजार रुपये यापूर्वीच घेतल्याचे मान्य केले. उर्वरित २५ हजार रुपयांपैकी १० हजार रुपये स्वीकारताना संबंधित लिपिकाला तहसील कार्यालयासमोरील केज-बीड रोडवरील टपरीसमोर लाचलुचपत विभागाने सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.

लिपिकाची अंगझडतीत लाचेची रोख रक्कम १० हजार रुपये आणि इतर रोख रक्कम पाच हजार पाचशे रुपये, विवो मोबाईल व दोन अंगठ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. लिपिक धाराशिव येथील रहिवासी असून त्याच्या निवास स्थानाची घरझडती घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सांगण्यात आले.याप्रकरणी पोलीस ठाणे केज येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत शिनगारे यांच्या पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे (जालना), पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपअधीक्षक बाळु जाधवर (जालना) ,तपास अधिकारी पोलीस निरीक्षक समाधान कवडे (बीड), गजानन घायवट, गजानन खरात, गजानन कांबळे, विठ्ठल कापसे यांनी केली.
कोणत्याही शासकीय कामासाठी कोणीही लोकसेवक लाचेची मागणी करत असल्यास, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल-फ्री क्रमांक १०६४ वर त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×