Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

पुण्यात मद्यधुंद मोटार चालकाच्या धडकेत पबमधील कर्मचारी ठार

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

कल्याणीनगर भागात रविवारी दुपारी घडला अपघात

marathinews24.com

पुणे – शहरातील कल्याणीनगर भागात रविवारी दुपारी मद्यधुंद मोटारचालकाने पबमधील एका कर्मचाऱ्याला धडक दिली. अपघातात कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मोटार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोटार चालक एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत संगणक अभियंता आहे.

प्रेयसी मृतावस्थेत; प्रियकराची रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या – सविस्तर बातमी 

सत्येंद्र मंडल (वय ३०, मूळ रा. बिहार)असे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी मोटार चालक प्रतापसिंह कायंगडे ( वय ४९, रा. धानोरी) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

‘कायंगडे मूळचा नवी मुंबईतील आहे. तो नेरूळ भागातील एका सोसायटीात राहायला आहे. तो येरवडा भागातील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कामाला आहे. सध्या तो धानोरी भागात राहायला आहे. तो रविवारी दुपारी कल्याणीनगर भागातील एका पबमध्ये आला होता. तेथे त्याने मद्यप्राशन केले. दुपारी तीनच्या सुमारास तो पबमधून बाहेर पडला. पबमधील ‘वॅले पार्किंग’ मध्ये मोटार लावली होती. कायंगडेने मद्यप्रशान केले होते. त्यावेळी मद्यधुंद अवस्थेतील कायंगडेला कर्मचाऱ्यांनी मोटारीतून घरी जाऊ नका, असे सांगितले. ॲप आधारित मोटारीतून घरी जा, असे सांगितले, अशी माहिती येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी सांगितले.

‘वॅले पार्किंग’मघून मोटार काढून कायंगडे धानोरीकडे जाण्यास निघाला. मोटार मागे नेत असताना मद्यधुंद अवस्थेतील मोटार चालक कायंगडेचे नियंत्रण सुटले आणि मागे थांबलेला पबमधील कर्मचारी सत्येंद्र मंडल हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला,’ असे पोलीस निरीक्षक बागवान यांनी सांगितले.

अपघाताची माहिती मिळताच परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली. आराेपी प्रतापसिंह कायंगडेला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा रात्री दाखल करण्यात आला. त्याची वैद्यकीय तपासणी ससून रुग्णालयात करण्यात आली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×