Breking News
MPSC Protest Pune : ‘पुणे बंद करण्याची भूमिका घेत असाल तर पुणेकरच उत्तर देतील’; MPSC आंदोलनावर आमदार डावखरेंचा रोहित पवारांना सल्लाMPSC Protest: एमपीएससी आंदोलनाविरोधात जनहित याचिकाFarmers, Drought : दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूरPune Crime : पुण्याच्या ग्रामदैवताची दानपेटी फोडली, आरोपीला बेड्या630 Special Teachers Felicitation : दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या विशेष शिक्षकांच्या कार्याचा गौरवVasundhara Pady Dindi : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘वसुंधरा पायी दिंडी’चे प्रस्थानDr Anil Dudhabhate Medical Award : ‘दृष्टीदूत’ डॉ. अनिल दुधभाते यांना मराठवाडा युवा मंचचा वैद्यकीय पुरस्कारSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत बारामतीत महिला आरोग्य, अवयवदान व रक्तदानाबाबत जनजागृतीSonali Kulkarni : चित्रपटाविषयी प्रेक्षकांनी सम्यक प्रतल शोधणे आवश्यक-सोनाली कुलकर्णीPune Crime : भरदिवसा दुचाकीच्या डिक्कीतून दागिने चोरीला

Pune BJP Worker Assault : भाजप कार्यकर्त्याची दादागिरी; तरुणाला मारहाण केल्याने गुन्हा दाखल

Pune BJP Worker Assault : भाजप कार्यकर्त्याची दादागिरी; तरुणाला मारहाण केल्याने गुन्हा दाखल

सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल

marathinews24.com

पुणे – Pune BJP Worker Assault : भाजप कार्यकर्ता पृथ्वीराज पंडित याने तरुणाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाइलमधील डेटा फॉरमॅट झाल्याच्या कारणावरून ही मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल आले आहे. तक्रारदार क्षितिज सागर पवार असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव असून, तो व्हीएफएक्स आणि ॲनिमेशनचे काम करतो. पृथ्वीराज पंडित हे त्याला त्याच्या कामाचे व्हिडिओ एडिटिंग करण्यास देत होता.

दिवेआगर दुर्घटनेत आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा मृत्यू – सविस्तर बातमी

तक्रारीनुसार, पंडितने २८ सप्टेंबरला क्षितीजला कसबा गणपती मंदिराजवळ व्हिडिओ एडिट करण्यासाठी बोलावून स्वतःचा फोन दिला. त्यावेळी नजर चुकीने फोनमधील डेटा फॉरमॅट झाला. याच कारणावरून संतापलेल्या पृथ्वीराज पंडितने २९ सप्टेंबरला दुपारी साडेबाराच्या सुमारास क्षितिजच्या घरी जाऊन त्याला जाब विचारला. Pune BJP Worker Assault शिवीगाळ घरात असलेल्या तांब्याच्या बाटलीने त्याच्या डोक्यात तीन ते चार वेळा मारहाण केली. त्यानंतर डेटा रिकव्हर करण्यासाठी नारायण पेठेतील पत्र्या मारुती चौकातील दुकानात नेले असता, तेथे काम न झाल्याने पंडित याने पुन्हा चिडून लाकडी बांबूने क्षितीजला जबर मारहाण केली. जखमी झालेल्या क्षितीजवर ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.

याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी पृथ्वीराज गजानन पंडित याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष गोरे करत आहेत. दरम्यान, विशाल धनवडे यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पृथ्वीराज पंडित याच्यावर यापूर्वीही विनापरवानगी दहीहंडी साजरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. आता पुन्हा एका तरुणावर थेट प्राणघातक हल्ला आणि दादागिरी केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने राजकीय वर्तुळात त्याच्या वर्तणुकीसंदर्भात जोरदार चर्चा रंगली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×