Breking News
पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

मुंबई हल्ल्यातील हुतात्म्यांना पुणे शहर पोलिसांची मानवंदना

सारसबागेत चित्रकलेतून ४ हजार ३०० चिमुकल्यांनी वाहिली आदरांजली

पुणे – मुंबईमधील २६/११ हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुणे पोलीस दलासह पुणेकरांनी मानवंदना दिली. हुतात्मा सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून उभारलेल्या स्तंभाला बँडच्या साथीने मानवंदना देत त्यांच्या हौतात्म्याला पुणे पोलिसांनी सलाम केला. पोलिसांसह ४ हजार ३०० शालेय विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची कारवाई – सविस्तर बातमी

मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ पुणे शहर पोलीस आणि शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे सारसबागेमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पुणे शहर पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पंकज देशमुख, संजय पाटील, पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवनकर, कृषीकेश रावले, मिलिंद मोहिते, संभाजी कदम, संदीप भाजीभाकरे, हिंमत जाधव, सहा. पोलीस आयुक्त राहुल आवारे यांसह राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, राजाभाऊ कदम, डॉ. मिलिंद भोई, उदय जगताप तसेच पोलीस खात्यातील निवृत्त अधिकारी उपस्थित होते.

सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, अध्यक्ष नितीन होले, अमर लांडे, सचिन ससाने, उमेश कांबळे, विक्रांत मोहिते, परग शिंदे, विशाल भोसले, दत्ता मिसाळ, जगदीश शेटे, सुनील जाधव, राजाभाऊ महाडिक यांनी उपक्रमाचे आयोजन केले. यावेळी भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम यांनी केले. चित्रकला स्पर्धा पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व खुल्या गटासाठी आयोजित करण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण विवेक खटावकर, गिरीश चरवड, संदीप गायकवाड, समीर धर्माधिकारी, नितीन पासलकर, सुधीर लिंगायत , नितीन होले, मनोहर देसाई यांनी केले. स्पर्धेचा बक्षीस समारंभ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, राहुल आवारे, रामराज्य सहकारी बँकेचे बाळासाहेब रायकर, हरिदास चव्हाण, पराग ठाकूर यांच्या हस्ते झाला. सूत्रसंचालन प्रसाद भारदे यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×