Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

Pune Crime News : डेक्कनमधील फ्लाइंग जिप्सी कॅफेत तरुणावर वार करणाऱ्याला बेड्या

Pune Crime News

युनिट चारची कारवाई

marathinews24.com

पुणे – Pune Crime News : शहरातील मध्यवर्ती डेक्कन परिसरात नियमांचे उल्लंघन करत रात्रभर कॅफे उघडे ठेवणाऱ्या फ्लाईग जिप्सी कॅफेत तरुणावर खुनी हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट चारने आरोपीला कोथरुड परिसरातुन ताब्यात घेत अटक केली. प्रेम ऊर्फ पप्पू सतीश वाल्हेकर (वय २१, रा. मोरे श्रमिक वसाहत, कोथरूड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूकीचे आमिष तरुणाच्या अंगलट – सविस्तर बातमी 

जुन्या वादातून टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना १५ ऑगस्टला फ्लाईग जिप्सी कॅफेत घडली होती. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी आरोपींसह कॅफे मालकाला अटक केली होती. मात्र, दोन महिन्यांपासून यातील आरोपी फरार झाला होता. युनिट चारचे पथक फरार आरोपींचा शोध घेत होते. उपनिरीक्षक वैभव मगदूम यांच्या पथकातील अंमलदार विशाल इथापे यांना आरोपी औंध रोडला थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

आरोपी प्रेम वाल्हेकर हा डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात फरार होता. चौकशीत त्याने जुन्या भांडणाच्या कारणावरून १५ ऑगस्टला पहाटे साडेतीनच्या सुमारास कॅफे फ्लाइंग जिप्सीत मित्रांसह एका तरुणावर कोयत्याने वार केले होते. (Pune Crime News) याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोपीचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव उपनिरीक्षक वैभव मगदूम, विशाल इथापे, जहांगीर पठाण, सुभाष आव्हाड, नितीन साबळे, अनिकेत भोसले, शरद झांजरे, रोहिणी पांढरकर यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×