Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

Pune Crime News : पुण्यात दुकानांचा पत्रा उचकटून चोरी करणारा गजाआड

Pune Crime News

४ दुकानात चोरी केल्याचे उघड

marathinews24.com

पुणे – Pune Crime News : दुकानांचा पत्रा उचकटून महागडे कपडे, तसेच अन्य वस्तू चोरुन पसार झालेल्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली. चोरट्याने वाघोली आणि लोहगाव भागात चार दुकानांमध्ये चोरी केल्याचे उघडकीस आले असून, त्याच्याकडून कपडे, वायर, मोबाइल, रोकड असा ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तेजस विष्णू मेंढके (वय ३२, रा. गायरान वस्ती, वाघोली, पुणे अहिल्यानगर रस्ता) असे अटक केलेल्याचे नाव आहे. वाघोली परिसरात दुकानांचा पत्रा उचकटून कपडे, तसेच अन्य मुद्देमाल चोररुन नेण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या.

अमेरिका, कॅनडातील नागरिकांना गंडा; लोणावळ्यातील काॅल सेंटरवर छापा – सविस्तर बातमी 

वाघोली पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले होते. दुकानात चोरी करणारा चोरटा नगर रस्ता परिसरात थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी ऋषीकेश व्यवहारे, योगेश शिंदे यांना मिळाली. Pune Crime News पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. चौकशीत त्याने लोहगाव आणि वाघोली परिसरातील चार दुकानात चोरी केल्याची माहिती मिळाली. त्याच्याकडून कपडे, मोबाइल, वायर, रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याने अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केल्याची शक्यता असून, त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.

अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ सातचे उपायुक्त अबिनाशकुमार, सहायक आयुक्त अनिता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, गुन्हे शाखेच्या निरीक्षक पल्लवी मेहेर, मंगेश जगताप, उपनिरीक्षक शिवशंकर राघू, बाळासाहेब मोराळे, महादेव कुंभार, विशाल गायकवाड, पांडुरंग माने, मारुती वाघमारे, योगेश शिंदे, अमोल घावटे, राहुल गोरे यांनी ही कारवाई केली.

गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी अटकेत

गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली. भवानी पेठ परिसरात ही कारवाई करण्यात आली. मोईन आसिफ घोडके (वय २५, रा. भवानी पेठ मटण मार्केटजवळ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सहा महिन्यांपूर्वी समर्थ पोलीस ठाण्यात घोडकेविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पसार झाला होता. गेले सहा महिने तो पोलिसांना गुंगारा देत होता. घोडके हा भवानी पेठ परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकमधील पोलीस हवालदार प्रमोद जगताप, उमेश शेलार यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलीस निरीक्षक दीपक लगड, सहायक निरीक्षक धीरज राऊत, किरण मोरे, सचिन कोळी, अविनाश दळवी यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×