विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – शहरातील आळंदी रोडवरील ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरांनी सीबाआय अधिकारी, कर्नाटक पोलिस असल्याची बतावणी करत चाइल्ड ट्रॅफिकिंगच्या नावाखाली २२ लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी चंद्रराम बालण्णा कुतापेल्ली (वय ७१) या ज्येष्ठाने दिलेल्या फिर्यादीवरून विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात वर्षभरापासून फरार असलेला आरोपी जेरबंद – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रराम कुतापेल्ली यांना ५ ते १५ ऑक्टोबर दरम्यान सायबर चोरांनी संपर्क साधला. कर्नाटक पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच सीबीआय ऑफिसर असल्याची बतावणी त्यांच्याकडे केली. चाइल्ड ट्रॅफिकिंगसाठी तुमच्या सीमकार्डचा दुरुपयोग झाल्याचे सांगितले. सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून त्यांच्याकडून २२ लाख उकळले. डिजिटल अरेस्ट करण्यात येणार असल्याचे सांगत त्यांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक राऊत करत आहेत.




















