Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

Pune District Youth Festival 2026 : बारामती येथे ४ नोव्हेंबरला जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन

Pune District Youth Festival 2026

युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे आवाहन

marathinews24.com

पुणे – Pune District Youth Festival 2026 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र, टी.सी. कॉलेज, बारामती आणि राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटना, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पुणे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन बुधवार, दिनांक ४ नोव्हेंबर २०२६ रोजी टी.सी. कॉलेज, बारामती येथे करण्यात आले आहे.

सीजेपी, राहुल गांधी, नेहा बोरा आणि अन्य फुटीरतावादी यांनी मर्यादेत रहावे- नितीश भारद्वाज – सविस्तर बातमी 

महोत्सवात समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, चित्रकला, पथनाट्य, कविता लेखन तसेच विकसित भारत चॅलेंज अंतर्गत पीपीटी सादरीकरण या स्पर्धांचा समावेश आहे. जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धांतील विजेत्यांना प्रावीण्य प्रमाणपत्र व बक्षीस रक्कम देण्यात येणार आहे. पीपीटी सादरीकरणातून सहा स्पर्धकांची राज्यस्तरीय सहभागासाठी निवड करण्यात येईल.

या स्पर्धांसाठी १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक-युवती पात्र असतील. स्पर्धकांनी प्रवेश अर्जासोबत आधारकार्ड व जन्माचा दाखला जोडणे आवश्यक असून, शाळेचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार नाही. तसेच सर्व स्पर्धकांनी ‘माय भारत’ पोर्टलवर वैयक्तिक नोंदणी करणे अनिवार्य आहे. VBYLD-२०२६ मधील सांस्कृतिक विभागात राष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेले युवा यावर्षी स्पर्धेसाठी पात्र राहणार नाहीत. (Pune District Youth Festival 2026) इच्छुक कलाकार व स्पर्धकांनी आपले प्रवेश अर्ज दि. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत व्हॉट्सॲपद्वारे किंवा dsopune6@gmail.com या ई-मेलवर सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

अधिक माहितीसाठी श्रीमती अश्विनी हत्तरगे, क्रीडा अधिकारी (मो. ७३८७८८०४२७) व सोमनाथ कदम (मो. ८८८८४६०४८६) यांच्याशी संपर्क साधावा. पुणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कला अकादमी व विविध संस्थांमधील इच्छुक कलाकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×