Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पुण्यातील गुंड टिपू पठाणचे बँक खाते गोठविले

जमीन व्यवहाराच्या कागदपत्रांसह, मोटार, गृहोपयोगी वस्तू जप्त

marathinews24.com

पुणे – शहरातील हडपसरमधील सय्यदनगर भागात दहशत माजविणारा गुंड रिझवान उर्फ टिपू सत्तार पठाण याच्यासह साथीदारांची बँक खाती गोठविण्यात आली आहे. काळेपडळ पोलिसांनी पठणसह साथीदारांची घराची झडती घेतली. तेथून जमीन व्यवहारासंदर्भातील कागदपत्रे, महागडी मोटार, तीन दुचाकी, तसेच गृहोपयोगी वस्तू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कुख्यात गुंड टिपू पठाणच्या मालमत्तेवर टाच – सविस्तर बातमी

टिपू पठाणने केलेल्या बेकायदा बांधकामावर काळेपडळ पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने नुकतीच कारवाई केली होती. या कारवाईत पठाण याचे कार्यालय, तसेच बेकायदा बांधकाम पाडून टाकण्यात आले हाेते. या कारवाईनंतर पोलिसांनी पठाण याच्यासह १० साथीदारांच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. त्यांच्या घरातून पंखे, दूरचित्रवाणी, धुलाई यंत्र, महागडे फर्निचर असा चार ते पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पठाण आणि साथीदारांच्या नातेवाईकांनी महागड्या गृहोपयोगी वस्तू खरेदीची बिले सादर केली नाहीत.

पोलिसांनी पठाण याच्या घरातून दोन साठेखत जप्त केले आहेत. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमर काळंगे, सहायक निरीक्षक अमित शेटे, प्रवीण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतीक लाहिगुडे, विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर, महादेव शिंदे यांनी ही कारावई केली.

हडपसरमधील सय्यदनगर परिसरात गुंड रिझवान उर्फ टिपू सत्तार पठाण याची दहशत आहे. त्याच्याविरुद्ध वानवडी, हडपसर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. पठाणने एका महिलेला धमकावून तिच्या जमिनीचा बेकायदा ताबा घेतला होता. महिलेने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली होती. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पठाण याच्यासह १६ साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पठाणसह साथीदारांना अटक करून त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×