चोरट्यांविरुद्ध फरासखाना आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
marathinews24.com
पुणे – Pune Jewellery Theft : गणेशोत्सवात दर्शनासाठी आलेल्या भाविक महिलांचे दागिने लांबविण्यात आल्याच्या घटना घडल्या. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध फरासखाना आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर दोन महिलांच्या गळ्यातील दागिने लांबविण्यात आले. याबाबत कोथरूड भागातील एका महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाही – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर शनिवार वाड्याजवळ विविध वस्तुंचे विक्री करणारे तात्पुरती दुकाने थाटण्यात आली आहेत. तक्रारदार महिला रविवारी (२० सप्टेंबर) खरेदी करत होती. त्या वेळी गर्दीत महिलेच्या गळ्यातील ३८ हजारांचे दागिने लांबविण्यात आले. याच परिसरात आणखी एका महिलेचे दागिने लांबविण्यात आले. पोलीस हवालदार राठोड तपास करत आहेत.
छत्रपती शिवाजी रस्त्यावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या उत्सव मंडपाच्या परिसरात एका महिलेच्या गळ्यातील ३० हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरण्यात Pune Jewellery Theft आल्याची घटना १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. याबाबत खडकी भागात राहणाऱ्या एका महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस हवालदार श्रीकांत वाघवले तपास करत आहेत. १८ सप्टेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास हुतात्मा बाबू गेणू मंडळाच्या उत्सव मंडप परिसरात एका महिलेच्या १२ हजार रुपयांचे दागिने लांबविण्यात आले. याबाबत महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, हवालदार अहिरे तपास करत आहेत.
Pune Jewellery Theft याच परिसरात चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील ३० हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले. तक्रारदार महिला मूळची नांदेडची रहिवासी असून, ती १८ सप्टेंबर रोजी दर्शनासाठी आली होती. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.























