वाचनसंस्कृती जनजागृतीसाठी पुणे- कुर्डुवाडी सायकलवारीचे आयोजन

वाचनसंस्कृती जनजागृतीसाठी पुणे- कुर्डुवाडी सायकलवारीचे आयोजन

डॉ चांडक, पाटणकर व खापरे करणार प्रवास

marathinews24.com

पुणे – मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांवर त्याचे दुष्परिणाम होत आहेत. त्यामुळे मुले एकलकोंडी बनत असून कुटुंबातील संवाद हरवत चालला आहे. आजी आजोबा व नातवंडामध्ये गोष्टीतून होणारा संवाद व कौटुंबिक वाचन हरवत चालले आहे. घरा घरात होणाऱ्या कौटुंबिक वाचन ची जागा दुर्दैवाने मोबाईल व टीव्हीने घेतली आहे. यासाठीच कौटुंबिक वाचन व वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी प्रसार व संवादाची गरज आहे. म्हणूनच पुणे – आळंदी – पंढरपूर – कुर्डुवाडी 350 किमी सायकलवारीतून विविध शाळा, कॉलेज, महाविद्यालयात संवाद साधत दि 29 जून ते 1 जुलै दरम्यान होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) चे अध्यक्ष डॉ पवन चांडक, कलाशिक्षक पांडुरंग पाटणकर , सेवानिवृत्त न्यायालयीन सेवानिवृत्त कर्मचारी राजेंद्र खापरे हे सायकलवर बॅकअप वाहन न घेता एकाकी प्रवास करणार आहेत.

हरे राम हरे कृष्ण..जयघोषात पुण्यात श्री श्री जगन्नाथ रथयात्रा – सविस्तर बातमी 

सायकलवारीचा मार्ग

पुणे रेल्वे स्टेशन हुन 29 जून रोजी सकाळी सायकलिंग करत आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी चे दर्शन घेऊन लोणीकंद मार्गे उरली, यवत, चौफुला मार्गे पाटस कुरकुंभ मार्गे भिगवन येथील मुक्काम करतील. पुढे 30 जून रोजी इंदापूर येथे शालेय विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती जोपासण्यासाठी व मनोरंजनातून शिक्षण या विषयी मार्गदर्शन करणार आहेत. अकलूज येथे तुकाराम महाराज पालखी चे दर्शन घेऊन पंढरपूर येथे मुक्काम होईल. 1 जुलै रोजी वेळापूर हुन निघून पालवी एड्स प्रकल्प येथे संवाद साधून विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर येथे दर्शन घेऊन कुर्डुवाडी येथे समारोप करतील.

डॉ पवन चांडक यांची ही 11 वी सायकल वारी आणि 1 लाख 11 हजार किमी सायकलिंगचा टप्पा पूर्ण केला आहे. यापूर्वी 2013 पासून ते 2024 दरम्यान एचआयव्ही एड्स जनजागृती सोबत एचआयव्ही संक्रमित बालकांच्या मूलभूत प्रश्न जसे शिक्षण, आरोग्य व पुनर्वसन विषयी सर्वसामान्यांमध्ये सायकलिंग मोहिमेतून संवाद साधून आजवर भारतातील 12 राज्य – महाराष्ट्र, गुजरात, गोवा, राजस्थान, पंजाब, हरयाणा, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि 4 देश ज्यात इंग्लंड, स्कॉटलंड, जर्मनी, फ्रांस भागात आजवर केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top