Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

Pune Lokmanya Festival 2026 : पुणे लोकमान्य फेस्टिव्हलचे दिमाखात उद्घाटन

१२ ते २५ ऑक्टोबरदरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी; गरबा, दांडिया, लावणी, संगीत, नृत्य आणि रावणदहनाचा थरार

marathinews24.com

पुणे – नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून शिवगर्जना प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘पुणे लोकमान्य फेस्टिव्हल – नवरात्र उत्सव २०२६’चे लोकमान्यनगर, जॉगिंग पार्कजवळ, नवी पेठ येथे दिमाखात उद्घाटन झाले. यावेळी देवीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. शौर्य ढोल-ताशा पथकाच्या वादनाने उद्घाटन सोहळ्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

महाराष्ट्राच्या मातीतून मेक्सिकोपर्यंत पोहोचणार ‘रॅपर स्वॅगर बॉयचं “नाच ना” गाणं प्रेक्षकांच्या भेटीला – सविस्तर बातमी

यंदा या महोत्सवाचे २९ वे वर्ष असून, परंपरा आणि आधुनिकतेचा सुरेख संगम साधत पुणेकरांसाठी विविध सांस्कृतिक, धार्मिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी आयोजित करण्यात आली आहे. महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. गणेश सातपुते, निमंत्रक शुभांगी सातपुते आणि उत्सव अध्यक्ष डॉ. नरेश मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव साजरा होत आहे.

विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

महोत्सवांतर्गत १२ ऑक्टोबर रोजी ‘साई दरबार’, १३ ऑक्टोबर रोजी ‘पाहणं तुम्ही म्हणाल तसं’ हा लावणी कार्यक्रम, १४ ऑक्टोबर रोजी ‘गीतों का सफर’, तर १५ ऑक्टोबर रोजी लोकप्रिय ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

१६ ऑक्टोबर रोजी महाकाली तांडव नृत्याचा लाईव्ह शो, १७ ऑक्टोबर रोजी महिलांसाठी ‘रास रिदम गरबा नाईट’, १८ ऑक्टोबर रोजी ग्रुप डान्स आणि सोलो डान्स स्पर्धा, तर १९ ऑक्टोबर रोजी दांडिया कार्यक्रम रंगणार आहे. २० ऑक्टोबर रोजी दसऱ्यानिमित्त रावणदहनाचा कार्यक्रम होणार असून, २५ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त ‘टेंशन खल्लास’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सर्व कार्यक्रम नागरिकांसाठी विनामूल्य

या महोत्सवाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे सर्व कार्यक्रम नागरिकांसाठी विनामूल्य खुले ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पुणेकरांना कुटुंबीयांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता येणार आहे. पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महोत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन पुणे लोकमान्य फेस्टिव्हलच्या वतीने करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×