Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

Pune Mahalaxmi Temple : देवीस्वरूप असलेल्या १०८ मुलींचे श्री महालक्ष्मी मंदिरात कन्यापूजन

Pune Mahalaxmi Temple

श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागतर्फे आयोजन ; विविध शाळेतील मुलींचा सहभाग

marathinews24.com

पुणे – Pune Mahalaxmi Temple : ‘या देवी सर्वभूतेषु, शक्तिरूपेण संस्थिता… नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः…’ या मंगल स्वरांनी महालक्ष्मी मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागच्या वतीने सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात बाल शिशु मंदिर आणि समर्थ विद्या मंदिर प्राथमिक शाळेतील १०८ मुलींच्या ‘कन्यापूजन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मराठी कवितेतील शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताचा पुण्यात रंगणार अनोखा आविष्कार – सविस्तर बातमी 

कन्या पूजन हा नवरात्री पूजेचा एक अविभाज्य भाग आहे. ज्यामध्ये लहान मुलींना देवी दुर्गाच्या नऊही रूपांचे प्रतीक मानून त्यांची देवी म्हणून पूजा केली जाते. यावेळी अभिनेत्री पूजा पवार, अपूर्वा सपकाळ, मंदिर ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त व उत्सव प्रमुख डॉ.तृप्ती अग्रवाल, विश्वस्त प्रवीण चोरबेले आदी उपस्थित होते.

कन्यापूजन करताना मुलींचे पाद्यपूजन आणि औक्षण करण्यात आले. Pune Mahalaxmi Temple सुगंधित अत्तरपाणी मुलींवर शिंपडून त्यांचे पाद्यपूजन देखील करण्यात आले, तसेच ट्रस्टतर्फे सर्व मुलींना खाऊ आणि भेटवस्तू देण्यात आल्या. देवीनामाचा जयघोष करीत देवीस्वरूप असलेल्या लहान मुलींनी आपले पूजन होत असल्याचे दृश्य पाहिले आणि त्यावेळी प्रत्येक चिमुकलीच्या चेहऱ्यावरील आनंद काहीसा वेगळा होता.

प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल म्हणाल्या, श्री महाकाली, श्री महालक्ष्मी आणि श्री महासरस्वती या आदिशक्तीच्या त्रिदेवी स्वरूपाचे पवित्र अधिष्ठान श्री महालक्ष्मी मंदिरात आहे. शक्ती, बुद्धी आणि धनधान्य देणाऱ्या मातांची रूपे वेगवेगळी आहेत आणि लहान मुलींमध्येच ही रूपे दिसतात. कन्या हे देवीचे स्वरूप असते. मात्र, मुलींनी केवळ पूजेपुरते मर्यादित न राहता प्रत्येक क्षेत्रात धैर्याने काम करायला हवे. त्यांनी खूप शिकून मोठे व्हायला हवे, तरच खऱ्या अर्थाने देवी प्रसन्न होईल.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×