Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

Pune MLC Vote Counting Training : विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी अचूक, पारदर्शक व नियमानुसार पार पाडा; विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले

Pune MLC Vote Counting Training

पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेबाबत प्रशिक्षण संपन्न

marathinews24.com

पुणे – Pune MLC Vote Counting Training : विधान परिषदेसाठी होणाऱ्या पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया अचूक, पारदर्शक आणि नियमानुसार पार पाडण्यासाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने आपल्यावर सोपविलेली जबाबदारी दक्षतेने पार पाडावी. मतपत्रिकांवरील पसंतीक्रमानुसार मतमोजणीची प्रक्रिया असल्याने प्रत्येक टप्प्यावर विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिले.

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी पुणे जिल्ह्यात विशेष मोहीम – सविस्तर बातमी 

पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अल्पबचत भवन सभागृहात मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणास सह आयुक्त संजय पलांडे, अपर जिल्हाधिकारी तथा महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक अरुण आनंदकर यांच्यासह विभागातील अधिकारी तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मतमोजणीची प्रक्रिया वेळबद्ध असली, तरी घाई करून चुका करण्यापेक्षा प्रत्येक टप्पा नियमानुसार पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही एका कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे संपूर्ण पथकाचे श्रम आणि वेळ वाया जाऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने आणि जबाबदारीच्या जाणीवेतून काम करावे. (Pune MLC Vote Counting Training) मतमोजणी प्रक्रियेत टेबलवरील पर्यवेक्षक, सहाय्यक, संबंधित अधिकारी आणि माहिती संकलन करणाऱ्या पथकांमध्ये समन्वय असणे आवश्यक असल्याचे श्रीमती तेली-उगले यांनी सांगितले.

विधान परिषद निवडणुकीत मतपत्रिकांद्वारे पसंतीक्रमानुसार मतदान होत असल्याने मतमोजणीची प्रक्रिया ईव्हीएमवरील मतमोजणीपेक्षा वेगळी असते. त्यामुळे प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने प्रक्रियेतील बारकावे समजून घेऊन आपल्यावर सोपविलेली जबाबदारी अचूकपणे पार पाडावी. मतमोजणीच्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक पडताळणी करावी, नोंदी व्यवस्थित ठेवाव्यात आणि संबंधित मतमोजणी प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या घेण्याची दक्षता घ्यावी, असे विभागीय आयुक्तांनी सांगितले.

निवडणूक कामकाजासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणादरम्यान आपल्या शंकांचे निरसन करून घ्यावे. मतमोजणीच्या दिवशी कोणतीही संदिग्धता राहू नये, यासाठी आवश्यक नियम, सूचना आणि कार्यपद्धतींचा अभ्यास करावा. निवडणूक कामकाजातील हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचेही विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले. शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांनी पुढील प्रशिक्षणात प्रत्यक्ष प्रक्रियेचा सराव करून मतमोजणीसाठी सज्ज राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. सह आयुक्त पलांडे यांनी प्रशिक्षणादरम्यान मतमोजणी प्रक्रियेचे विविध टप्पे, कामानुसार जबाबदाऱ्यांची विभागणी, नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची कर्तव्ये, वैध व अवैध मतपत्रिकांबाबतच्या तरतुदी, मतमोजणीच्या वेळी घ्यावयाची दक्षता तसेच निवडणूक आयोगाचे नियम व कार्यपद्धती याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी श्री. आनंदकर म्हणाले, शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी येत्या २६ ऑक्टोबर रोजी बालेवाडी येथे प्रत्यक्ष प्रशिक्षण होणार आहे. यामध्ये मतपेट्या उघडणे, ५० मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करणे आणि मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया यांचे प्रात्यक्षिक देण्यात येणार आहे. मतमोजणी निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मतमोजणी प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यांबाबत त्यांनी माहिती दिली.

मतमोजणीची प्रक्रिया निर्धारित नियमांनुसार आणि काटेकोरपणे पार पाडण्याच्या दृष्टीने प्रशिक्षणात विविध बाबी स्पष्ट करण्यात आल्या. मत मोजणी प्रक्रियेत सहभागी अधिकारी तसेच कर्मचारी यांनी विचारलेल्या प्रश्नांची देखील श्री पलांडे व श्री. आनंदकर यांनी उत्तरे दिली. यावेळी निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×