Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने ५ लाखांची फसवणूक

जादा परताव्याचे आमिष पडले ३६ लाखांना

पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने पाच लाखाांची फसवणूक केल्या प्रकरणी एकाविरुद्ध खराडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत लता अरुण साळुंके (वय ६०, रा. गोल्डन चौक, चाकण) यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, केतन दादासाहेब साळुंके (वय ४०, रा. एमआयटी महाविद्यालयासमोर, लोणी काळभोर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वारजे भागात सोसायटीतील दुकानात आग – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने लता साळुंके यांच्याकडे पोलीस असल्याची बतावणी केली होती. पुणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे त्याने सांगितले होते. फिर्यादी साळुंके यांच्या नातीला महापालिकेच्या जन्म मूत्यू विभागात नोकरीला लावण्याचे आमिष त्याने दाखविले. खराडी भागातील एका उपाहारगृहाजवळ आरोपीने त्यांची भेट घेतली. गेल्या पंधरा ते वीस दिवसांत त्यांच्याकडून वेळाेवेळी पैसे घेतले. महापालिकेत नोकरी लावण्याबाबत त्यांनी विचारणा केली. पैसे मिळाल्यानंतर त्याने टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच खराडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक घुले तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×