Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

Pune Rabi Crop Planning : दुष्काळी परिस्थितीत रब्बी पिकांसह चारा उत्पादनाला प्राधान्य

पुणे जिल्ह्यात ३ हजार हेक्टरवर ज्वारी, ८० हेक्टरवर हरभरा प्रात्यक्षिक प्रकल्प

marathinews24.com

पुणे – दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पीक नियोजनासाठी प्रोत्साहन देण्यासह पिकांचे संवर्धन, चारा उत्पादन आणि पाण्याची बचत करण्यासाठी कृषी विभागामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत जिल्ह्यात ३ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारी आणि ८० हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाचे प्रात्यक्षिक प्रकल्प राबविण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी दिली.

ज्वारी, हरभरा पिकांसाठी निविष्ठा उपलब्ध

ज्वारीच्या प्रात्यक्षिक प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना ज्वारीचे बियाणे, बीजप्रक्रियेसाठी जैविक खते, सूक्ष्म मूलद्रव्ये, जैविक कीटकनाशके आणि औषधे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच हरभरा पिकाच्या ८० हेक्टर क्षेत्रावरील लागवडीसाठी बियाणे व इतर आवश्यक निविष्ठा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. दुष्काळी परिस्थितीत रब्बी हंगामात योग्य पिकांची निवड, पीक व्यवस्थापन आणि संवर्धनाच्या उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आणि शेतीशाळांचे आयोजन करण्यात येत आहे.

७ हजार हेक्टर क्षेत्रावर चारा उत्पादनाचे नियोजन

पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने ७ हजार हेक्टर क्षेत्रावर चारा उत्पादन प्रकल्प राबविण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास निधीतून निधी मिळण्याकरिता प्रस्ताव सादर केला आहे. या प्रकल्पासाठी मका आणि कडवळ या चारा पिकांच्या बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा उपलब्ध राहावा, यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सूक्ष्म सिंचनातून पाण्याची बचत

पाण्याचा कार्यक्षम वापर करून उपलब्ध पाण्याची बचत करण्यासाठी केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचन संचांसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच दुष्काळी परिस्थितीत फळबागांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास निधीतून आवश्यक निधी मिळण्याकरिता प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

मुरघास निर्मितीसाठी यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन

दुष्काळी परिस्थितीत जनावरांसाठी चारा साठवून ठेवता यावा, यासाठी मुरघास पद्धतीने चारा तयार करण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत कडबा कुट्टी यंत्रासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येत असून, या माध्यमातून चारा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×