Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

पुणेकरांवर लायसेन्स रद्दीची टांगती तलवार

पुणेकरांवर लायसेन्स रद्दीची टांगती तलवार

थकित दंडाची रक्कम जमा करा, वाहतूक विभागाचे आवाहन

marathinews24.com

पुणे – शहरातील विविध भागात बेशिस्तपणे वाहने दामटणार्‍यांविरूद्ध वाहतूक विभागाने कारवाईचा वेग वाढवला आहे. त्यासोबतच वाहनांवरील प्रलंबित थकित दंड ३० दिवसांत न जमा केल्यास संबंधितांचे लायसेन्स रद्दीचा प्रस्ताव आरटीओला पाठवला जाणार आहे. अशा इशारा पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनो वेळीच तुमच्या वाहनावरील थकित दंडाची रक्कम चौकात वाहतूक नियमनासाठी थांबलेल्या अमलदारांकडे करावी, असेही आवाहन पोलिसांनी केले आहे.

पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीत महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकावर – सविस्तर बातमी 

वाहतूक नियमांचे उल्लंघन करूनही दंड न भरलेल्या वाहन मालकांना अधिकृत नोटीस पाठवण्यात येत आहे. त्यानुसार संबंधितांनी ३० दिवसांच्या आत दंड भरणे आवश्यक असल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे. दंड न भरल्यास वाहन चालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्याचा प्रस्ताव आरटीओकडे पाठवला जाणार आहे. तसेच प्रकरण न्यायालयात दाखल करण्याचीही कारवाई केली जाईल. त्यामुळे वाहन धारकांनी थकित दंडाकडे दुर्लक्ष न करता तात्काळ दंड भरावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, २६ ते २८ फेबु्रवारी आणि १ मार्च कालावधीतच पोलिसांकडून नोटीस पाठवली जाणार आहे. उर्वरित कालावधीत संशयास्पद मेसेजकडे दुर्लक्ष करण्याचेही आवाहन केले आहे.

नागरिकांनो असा जमा करा दंड

नागरिकांनो तुमच्या वाहनावरील थकित दंडाची रक्कम जमा करण्यासाठी पीटीपी अ‍ॅपचा वापर करावा. किंवा चौकात वाहतूक नियमनासाठी थांबलेल्या अमलदाराकडे दंड जमा करण्यासंदर्भात विचारणा करावी. तसेच आपल्या जवळच्या वाहतूक विभागातही दंड जमा करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे, वाहनधारकांना अधिकृत वेबसाइटसह अमलदारांकडे दंडाची रक्कम भरावी. डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे दंड भरता येणार आहे.

वाहतूक शिस्त सुधारण्यासाठी संबंधित मोहिम राबवण्यात येत असून, नागरिकांनी थकित दंडाची रक्कम जमा करून वाहतूक विभागाला सहकार्य करावे. दरम्यान, बेशिस्त वाहन चालक, मॉडीफाईड दुचाकीस्वारांसह मोटार चालकांविरूद्ध कारवाईची मोहिम सुरूच राहणार आहे.

हिम्मत जाधव, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×