Breking News
ब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हातपुण्यात चार घरफोड्या; ८ लाखांचा ऐवज चोरलाराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा 

शेअर ट्रेडींगच्या जाळ्यात पुणेकर अडकले

शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष पडले महागात

कोंढवा, हडपसरमधील नागरिकांनी ऑनलाईन लुट

marathinews24.com

पुणे – सायबर चोरट्यांनी पुणेकरांना घेरले असून, विविध आमिष दाखवून ऑनलाईनरित्या लुट केली जात आहे. विशेषतःशेअर मार्केटमधील गुंतवणूकीसह गिफ्टची बतावणी करीत लाखोंचा गंडा घातला जात आहे. साबयर चोरट्यांच्या जाळ्यात शिक्षितांसह उच्च शिक्षितही अलगदमध्ये अडकत चालले आहेत. वारंवार होणार्‍या फसवणूकींच्या घटनांमुळे सायबर चोरट्यांविरूद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

वारजेतील न्यू अहिरेगावात चोरी, ३२ लाखांचा ऐवज चोरीला – सविस्तर बातमी

शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूकीच्या आमिषाने सायबर चोरट्याने एकाला तब्बल २८ लाख २० हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १५ ऑगस्ट ते १९ ऑक्टोबर २०२५ कालावधीत कोंढवा बुद्रूक परिसरात घडली आहे. याप्रकरणी ४९ वर्षीय नागरिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारकासह बँक खातेधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे हे तपास करीत आहेत.

चांगल्या परताव्याच्या आमिषाला भुलून महिलेने तब्बल १९ लाख ५४ हजार रूपये ऑनलाईनरित्या वर्ग करीत स्वतःची फसवणूक करून घेतली आहे. ही घटना १५ सप्टेंबर ते ९ डिसेंबर २०२५ कालावधीत हडपसर परिसरात घडली आहे. याप्रकरणी ३६ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तक्रारदार महिलेला सायबर चोरट्यांनी शेअर मार्वेâटमधील गुंतवूणकीवर जादा परतावा देणार असल्याची बतावणी केली. तिच्याकडून १९ लाखांवर ऑनलाइनरित्या वर्ग करून घेत फसवणूक केली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील तपास करीत आहेत.

ट्रेडींगमधील गुंतवूणकीमुळे ३५ लाख गमावले

शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, या आशेने हडपसरमध्ये राहणार्‍या ५२ वर्षीय नागरिकाने तब्बल ३४ लाख ३५ हजार रूपये गमावले आहे. सायबर चोरट्यांनी त्यांचा विश्वास संपादित करून फसवूणक केल्याची घटना १ सप्टेंबर ते ३ डिसेंबर २०२५ कालावधीत हडपसर परिसरात घडली आहे. याप्रकरणी संबंधिताने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×