Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

Pune Seva Sankalp Campaign : समाजकल्याण विभागाच्या स्थापना दिनानिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहात साजरा

Pune Seva Sankalp Campaign

विद्यार्थ्यांनी भ्रमणध्वनीचा वापर मर्यादित ठेवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे- दीपा मुधोळ-मुंडे

marathinews24.com

पुणे – Pune Seva Sankalp Campaign : समाजकल्याण विभागाच्या स्थापना दिनानिमित्त सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, पुणे आणि विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बिबवेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहात राबविण्यात आले. या उपक्रमात सुमारे ८०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी भ्रमणध्वनीचा वापर मर्यादित ठेवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, ‘डिजिटल डिटॉक्स’ संकल्पना अंगीकारावी आणि समाजकल्याण विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले.

‘ग्रीन सोल्यूशन’ व चेक प्रजासत्ताकातील ‘रिसर्च सेंटर’मध्ये सामंजस्य करार – सविस्तर बातमी 

सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी यांची जाणीव युवकांमध्ये निर्माण करणे, तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांप्रती संवेदनशीलतेची शपथ देण्यात आली. Pune Seva Sankalp Campaign  तसेच ‘सेवा माझे योगदान’, आभार व संकल्पाची मानवी रांगोळी आणि समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांविषयी विशेष कार्यशाळा घेण्यात आली.

यावेळी सहायक आयुक्त विशाल लोंढे, प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे आणि संस्थेचे संचालक डॉ. राजेश जालनेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. समाजकल्याण निरीक्षक शहागडकर यांनी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.

महामानवांकडून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी जीवन उज्वल करावे असे सांगून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभलेल्या या उपक्रमातून सामाजिक संवेदनशीलता, सेवाभाव आणि समाजहितासाठी योगदान देण्याची प्रेरणा निर्माण होण्यास मदत होईल असा विश्वास श्री. लोंढे यांनी व्यक्त केला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×