चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – Pune Theft News : शहरातील कात्रज भागातील शेलार मळा परिसरात दोन सोसायटींमधील सदनिकांचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने, रोकड असा ऐवज चोरुन नेल्याची घटना उघडकीस आले. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ महिलेची १४ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कात्रजमधील शेलारमळा भागात असलेल्या ओैंदुबर छाया सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. कपाटातील १ लाख २८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना नुकतीच घडली. शेलार मळा परिसरात असलेल्या स्वामी कृपा अपार्टमेंटमधील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील १० हजार ५०० रुपयांचे दागिने चोरुन नेण्यात नेला. Pune Theft News शेलार मळा परिसरातील दोन सोसायट्यांमध्ये घरफोडी झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिकांमध्ये घबराट उडाली. पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे तपास करत आहेत.
फुरसुंगी परिसरातून १४ चाकी ट्रक चोरीला
हडपसर-सासवड रस्त्यावरील फुरसुंगी परिसरातून १४ चाकी ट्रक चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे फुरसुंगी रेल्वे उड्डाणपूल परिसरात राहायला आहेत. त्यांनी परिसरात १४ चाकी ट्रक लावला होता. चोरट्यांनी बनावट चावीचा वापर करुन ट्रक सुरू केला. ट्रक घेऊन चोरटे पसार झाले. ट्रक चोरीला गेल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस फौजदार हरिदास कदम तपास करत आहेत




















