चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – Pune Theft News : मद्य विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील ७० हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना कर्वेनगर भागात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दारुच्या नशेत पोलिसांना धक्काबुक्की; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वेनगर भागात अतुल वाईन्स हे मद्य विक्रीचे दुकान आहे. दुकानातील गल्ल्यात ७० हजार रुपयांची रोकड ठेवण्यात आली होती. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून गल्ल्यातील रोकड चोरल्याची घटना नुकतीच घडली. पोलीस उपनिरीक्षक दीक्षित तपास करत आहेत.
नऱ्हे भागातील एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील ७० हजार रुपयांचे दागिने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध नऱ्हे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस हवालदार भोरडे तपास करत आहेत. (Pune Theft News) बोपोडीतील भाऊ पाटील रस्त्यावर एका सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ६० हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत एकाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार भुजबळ तपास करत आहेत.




















