Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

पुणेकरांनो रस्त्यावरील बेवारस वाहने हलवा, अन्यथा वाहन जप्ती होणार

पुणेकरांनो रस्त्यावरील बेवारस वाहने हलवा, अन्यथा वाहन जप्ती होणार

वाहतूक विभागाचा निर्णय; २४ तासांचा दिला अल्टीमेटम

marathinews24.com

पुणे – नागरिकांनो तुम्ही जर अनेक दिवसांपासून रस्त्यावर एकाच ठिकाणे वाहने उभी केली असतील, तर संबंधित वाहने जागेवरून बाजूला काढून घेण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे. अन्यथा २४ तासांत संबंधित वाहनांना बेवारस घोषित करून जप्त केले जाणार आहे. ही मोहिम १५ एप्रिलपासून सुरू केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

पुणे जिल्ह्यात ३ हजार ८६१ रुग्णांना मदतीचा आधार; ३४ कोटी ५३ लाखांची मदत – सविस्तर बातमी 

शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी महत्त्वाची मोहीम हाती घेतली आहे. सार्वजनिक रस्त्यांवर दीर्घकाळ उभी असलेली बेवारस अथवा वापरात नसलेली वाहने जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विविध भागांत रस्त्याच्या कडेला अनेक महिन्यांपासून उभी असलेली वाहने वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. त्यामुळे अशा वाहनांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. मोहिमेअंतर्गत संशयित बेवारस वाहन मालकांना नोटीस दिली जाणार आहे. त्यानंतर ४८ तासांच्या आत कारवाई केली जाईल. तसेच वाहन मालकाने २४ तासांच्या आत वाहन हलवले नाही, तर ते वाहन ‘बेवारस’ घोषित करून जप्त करण्याचा इशाराही वाहतूक पोलिसांनी दिला आहे.

दंडात्मक कारवाईचा बडगा

रस्त्यावर बेशिस्तपणे उभ्या केलेल्या वाहनांवर नोटीस चिटकवली जाणार आहे. त्यानंतरही वाहने बाजूला न काढल्यास संबंधितांविरूद्ध दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. विशेषतः महापालिकेच्या माध्यमातून दंडात्मक कारवाईनंतर रक्कम जमा केल्याशिवाय वाहने परत माघारी दिली जाणार नाहीत. त्यामुळे वाहन मालकांनी तात्काळ रस्त्यावरील आपली वाहने हटवण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

नागरिकांनो इथे करा तक्रार

नागरिकांनो तुमच्या आजूबाजूला अनेक दिवसांपासून उभ्या असलेल्या वाहनांच्या बाबतीत तुम्ही पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाकडे तक्रार दाखल करू शकता. तसेच पीटीपी अ‍ॅपद्वारे तुम्ही पोलिसांना बेवारस वाहनांची माहिती द्यावी. त्याद्वारे संबंधित वाहन मालकाविरूद्ध दंडात्मक कारवाई करून वाहन बाजूला काढण्यास प्राधान्य देउ, असे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.

शहरातील विविध रस्त्यांवर बेवारस वाहने उभी असल्यामुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. त्यामुळे संबंधित वाहन चालक मालकांविरूद्ध मोहिम हाती घेण्यात आली आहे. आम्ही नोटीस दिल्यानंतर २४ तासांत गाड्या न बाजूला काढणार्‍याविरूद्ध वाहन जप्तीची कारवाई करणार आहे.

हिम्मत जाधव, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग, पुणे शहर

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×