सोसाट्याच्या वार्यामुळे शहरात झाडपडीच्या अनके घटना
marathinews24.com
पुणे – शहरात पुर्व मोसमी पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली असल्याचे चित्र दिसून आले. सोसाट्याच्या वार्यामुळे झाडपडीच्या १० घटना घडल्या आहेत. तर वाघोलीत होर्डिंग्ज कोसळले आहे. सुदैवाने कोणत्याही घटनेत जीवितहानी झाली नाही. झाडपडीच्या घटना येरवडा, कोरेगाव पार्क, धानोरी, एरंडवणा, देवाची ऊरुळी, बावधन, मुकुंदनगर परिसरात झाडे कोसळली होती. वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेत मदतकार्य केले.
वाळूगट, खाणपट्टयांच्या परवानगीचा कालावधी कमी करा – सविस्तर बातमी
अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्दळीच्या येरवडा, कोरेगाव पार्क, एरंडवणा परिसरासह उपनगरात झाडे पडली होती. याप्रकरणी नागरिकांनी अग्निशमक दलाच्या जवानांना माहिती दिली. त्यानुसार जवळच्या केंद्रातून जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. रस्त्यात पडलेली झाड्यांच्या फांद्या कापून रस्ता मोकळा करण्यात आला. १० ठिकाणी झाडपडीच्या घटनांमुळे परिसरातील वाहतूक काही काळ मंदावली होती. मात्र, अग्निशमक दलाच्या जवानांसह वाहतूक पोलिसांनी परिसरातील कोंडी फोडली.