राखी पौर्णिमेला भावाला जिवे मारण्याची धमकी; विवाहितेची आत्महत्या

दौंडजवळील रावणगावात पत्नीचा खून करुन पतीची आत्महत्या

आंबेगाव बुद्रुक परिसरातील घटना; पतीसह ७ जणांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – राखी पौर्णिमेला भावाला बोलविल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याने उच्चशिक्षित विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कात्रज भागातील आंबेगाव बुद्रुक भागात घडली. तरुणीचा शारिरिक आणि मानसिक छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन भारती विद्यापीठ पोलिसांकडून पतीसह सासरकडील नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
स्नेहा विशाल झेंडगे (वय २७, रा. आंबेगाव बुद्रुक, कात्रज) असे आत्महत्या केलेल्या विवाहित तरुणीचे नाव आहे.

कोयते लपविण्यासाठी आईची साथ- आई सहआरोपी; चार कोयते जप्त – सविस्तर बातमी 

याबाबत स्नेहा यांचे वडील कैलास मच्छिंद्र सावंत (वय ५५, रा. कर्देहळी, जि. सोलापूर) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पती विशाल झेंडगे, सासरे संजय झेंडगे, सासू विठाबाई झेंडगे, दीर विनायक झेंडगे, नणंद तेजश्री थिटे यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहा आणि विशाल यांचा विवाह गेल्या वर्षी २ मे २०२४ रोजी झाला होता. विवाहानंतर काही दिवसांतच सासरकडील मंडळींनी कंपनी चालविण्यासाठी माहेरून २० लाख रुपये आणण्याची मागणी केली. पैशांसाठी तिच्यामागे तगादा लावण्यात आला. पैशांसाठी स्नेहाला वारंवार शिवीगाळ,तसेच मारहाण केली होता. तिचा शारिरिक आणि मानसिक छळ केला.

छळ असह्य झाल्याने स्नेहाने पतीसह नातेवाईकांविरुद्ध यापूर्वी पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र, सासरे संजय झेंडगे यांचा साडू भाऊसाहेब कोल्हाळ याने तिला दमदाटी करून तक्रार मागे घेण्यास भाग पाडले होते. तक्रार मागे घेतल्यानंतरही स्नेहाचा छळ सुरू होता.राखी पौर्णिमेला भावाला बोलाविल्यास त्याला जिवे मारू, अशी धमकी तिला देण्यात आली होती. छळ असह्य झाल्याने स्नेहाने शनिवारी (९ ऑगस्ट) रात्री अकराच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आतम्हत्या केली, असे स्नेहाचे वडील कैलास सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०८, ८५, ११५ (२), ३५२, ३५१ (२)(३), ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविला असून पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×