Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरेंसोबत रक्षाबंधन

ईडा पीडा टळो, माझ्या चंद्रकांतच्या हातून लोकांच्या सेवंचं काम कायम घडत राहो – पद्मश्री राहीबाई पोपेरे

marathinews24.com

पुणे – बीजमाता राहीबाई पोपरे यांनी प्रतिवर्षी प्रमाणे आपला भाऊ म्हणजे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या साठी गावरान बियाण्यांपासून राख्या तयार केल्या असून, आज ना. पाटील यांच्या कोथरुड येथील निवासस्थानी ना. पाटील यांचे औक्षण करुन रक्षाबंधन सोहळा साजरा केला. तसेच, ना. पाटील यांच्या हातून जनसेवेचे व्रत निरंतर घडत राहो, असे आशीर्वाद देखील दिले.

बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियातर्फे वृक्षरक्षाबंधन – सविस्तर बातमी – सविस्तर बातमी

गावरान बियाणांचे जतन व संवर्धनाचे मोठे काम पद्मश्री राहीबाई पोपरे सातत्याने करत. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. दरवर्षी रक्षाबंधन सणासाठी त्या गावरान बियाणांपासून राख्या तयार करुन आपला भाऊ चंद्रकांतदादा पाटील यांना पाठवत असतात. यंदाही त्यांनी गावरान बियाणांपासून राख्या बनवून स्वतः ना. पाटील यांना बांधली.

यावेळी ना. पाटील यांनीही नम्रपणे राहिबाईंचे आशीर्वाद घेतले. ईडा पीडा टळो, माझा भाऊ चंद्रकांतदादाच्या लोकांच्या सेवंचं काम कायम घडत राहो, असे आशीर्वाद दिले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×