Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

जादा दराच्या वादातून रॅपिडो चालकावर हल्ला

जादा दराच्या वादातून रॅपिडो चालकावर हल्ला

लाथाबुक्क्या, दगडांनी मारहाण; ३ महिलांसह ६ जणांवर गुन्हा

marathinews24.com

पुणे – कॅब भाड्याच्या दरावरून झालेल्या वादातून रॅपिडो कॅब चालकावर सहा जणांनी लाथाबुक्क्यांनी व दगडांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोरमध्ये घडली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी तीन महिलांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यात मद्यधुंद मोटार चालकाची वाहनांना धडक – सविस्तर बातमी 

धवल रावले, सरस्वती रावले, वैष्णवी, यशवंत चळवादी, सुषमा चळवादी व मनीषा चळवादी (सर्व रा. लोणी काळभोर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला दाखल केला आहे. श्रीकृष्ण मधुकर लाड (वय ३०, रा. यशराज कॉम्प्लेक्स, लोणी काळभोर) असे जखमी चालकाचे नाव असून त्यांच्यावर कदमवाक वस्ती येथील जगदंब हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ एप्रिलला रात्री पावणेदहा वाजता साई सृष्टी अपार्टमेंटसमोर ही घटना घडली. फिर्यादी लाड यांना रॅपिडोवरून पिकअप बुकिंग मिळाल्याने ते तेथे पोहोचले. काही वेळाने धवल रावले याच्यासह चार महिला वाहनात बसल्या. चार प्रवासी नेण्यास परवानगी नसल्याचे लाड यांनी सांगितले. तसेच सीएनजी दरवाढीमुळे कंपनीने ठरविलेल्या भाड्यात गाडी चालविणे परवडत नसल्याने २५ रुपये प्रतिकिमी दराने जाण्याची अट त्यांनी घातली. यावरून प्रवाशांनी संताप व्यक्त करत वाद घातला व बुकिंग रद्द केले. त्यानंतर काही वेळातच आरोपी पुन्हा घटनास्थळी येऊन लाड यांना शिवीगाळ करत कारमधून बाहेर ओढले. त्यानंतर सर्वांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

एका आरोपीने दगड उचलून त्यांच्या डोक्यात मारला. तसेच कान, पोट, पाठ व पायांवरही प्रहार करण्यात आला. या हल्ल्यात लाड गंभीर जखमी झाले. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करून लाड यांना रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अंकुश बोराटे करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×