Breking News
Regular Health Checkup : नियमित आरोग्य तपासणीमुळे गंभीर आजाराचे धोके टाळण्यास मदत-डॉ. मृदुला जगतापआत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त शासकीय रुग्णालयात जनजागृतीपर उपक्रमPune Ganesh Visarjan : पुण्यात १० हजार पोलिसांचा फौजफाटा, गर्दीच्या नियोजनाला विशेष प्राधान्य- पोलीस आयुक्त अमितेश कुमारVishrantwadi Theft : महापालिकेच्या व्यायाम शाळेतून साहित्य चोरीRTO Cyber Fraud : ‘आरटीओ’च्या नावे बनावट चलन पाठवून ३ लाखांची फसवणूकTraffic Rules Pune : वाहतूक नियमांचे पालन करून पोलिस यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी सहकार्य करा- रवींद्र आहेररावPurandar Airport Project : पुरंदर विमानतळ प्रकल्पाचा मार्ग मोकळा;उच्च न्यायालयाने याचिका फेटाळलीबळीराजाच्या मदतीसाठी शासन बांधावर;संकटाच्या काळात महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या पाठीशी ! – विशेष लेखगणेश विसर्जन मिरवणुकीसाठी महावितरणची यंत्रणा सज्ज; पथके तैनातCyber Fraud Awareness Pune :‘लोकसंवाद-२०२६’मधून सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन

Regular Health Checkup : नियमित आरोग्य तपासणीमुळे गंभीर आजाराचे धोके टाळण्यास मदत-डॉ. मृदुला जगताप

नियमित आरोग्य तपासणीमुळे गंभीर आजारांचे धोके टाळण्यास मदत

marathinews24.com

बारामती – मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांची लक्षणे सुरुवातीला दिसत नाहीत. नियमित (Regular Health Checkup) तपासणीमुळे हे आजार प्राथमिक टप्प्यातच समजतात. त्यामुळे नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन तक्रारवाडी आरोग्य केंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. मृदुला जगताप यांनी केले.

आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त शासकीय रुग्णालयात जनजागृतीपर उपक्रम – सविस्तर बातमी

इंदापूर तालुक्यातील मदनवाडी येथे जय हनुमान सार्वजनिक तरुण मंडळ या गणेश मंडळात आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित श्रीगणेशा आरोग्याचा व जिल्हा माहिती कार्यालय पुणे यांच्या वतीने आयोजित लोकसंवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी नागरिकांना आरोग्य तपासणी करण्याचे महत्त्व सांगून केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली.

आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित व्यायाम, चालणे, संतुलित आहार, पुरेसे पाणी पिणे आणि दैनंदिन जीवनात सक्रिय राहण्याचा सल्ला देऊन नियमित आरोग्य (Regular Health Checkup) तपासणीमुळे आजारपण वेळेवर ओळखणे, उपचाराचा खर्च कमी होणे आणि निरोगी आयुष्य जगणे शक्य होते. आजार बळावण्यापूर्वीच त्यावर नियंत्रण मिळवता येते, ज्यामुळे भविष्यातील मोठ्या उपचारांचा खर्च टळतो. वेळीच तपासणी केल्यामुळे डॉक्टरांचे तुमच्या प्रकृतीनुसार योग्य आहार, व्यायाम आणि सवयी बदलांबद्दल वैयक्तिक मार्गदर्शन मिळते, असेही डॉ. जगताप यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×