Breking News
टँकरच्या चाकाखाली सापडून व्यावसायिकाचा मृत्यूलाॅरेन्स बिष्णोई टोळीकडून ओैषध वितरकाला खंडणीसाठी धमकीटँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यूरॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हे

नात्याला काळिमा फासला, पत्नीवर बलात्कार करण्यास मित्रांनाच भाग पाडले

मंच्युरियनमधून गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचारकाम देण्याच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

पुणे जिल्ह्यातील भरतगावातील घटना, चौघांना बेड्या

marathinews24.com

पुणे – नात्याला काळिमा फासणारी घटना पुणे जिल्ह्यातील भरतगावात घडली आहे. पत्नीला धमकावून जीवे मारण्याची धमकी देऊन पतीनेच तीन मित्रांना बायकोवर बलात्कार करण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील भरतगावात घडली आहे.

अपघातांना जबाबदार असलेली अवजड वाहने जप्त करणार- पोलीस आयुक्तांचा इशारा – सविस्तर बातमी

मागील दोन वर्षांपासून आरोपींनी पीडित महिलेवर अत्याचार केले असून, पीडितेला सर्व असह्य झाल्यानंतर तिने यवत पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पती आणि त्याच्या तीन मित्रांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी यवत पोलिसांनी चारही आरोपींना अटक केल्याची माहिती यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि तिचा पती भरतगावात राहायला असून, २०२३ पासून पतीने आपल्या पत्नीला धमकावून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर ३ मित्रांकडून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. धमकीच्या भीतीने तक्रारदार महिला सलग दोन वर्षांपासून गप्प बसली होती. मात्र, महिलेस शारीरिक व मानसिक त्रास सहन न झाल्याने तिने यवत पोलीस ठाण्यात धाव घेत आपबीती पोलिसांना सांगितली.

त्यानुसार यवत पोलिसांनी महिलेच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याच्या तीन मित्रांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करीत चारही आरोपींना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेश माने करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×