Breking News
Robotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूकPune Crime News : पैसे परत मागितल्याने तरुणावर कोयत्याने वारPune Bank Loan Fraud : जय भवानी सहकारी बँकेत साडेचार कोटींचा कर्ज घोटाळाMobile Theft in Pune : नवले पुलाजवळ तरुणाचा मोबाइल हिसकावलाPune Bank Fraud Case : नियमबाह्य कर्ज प्रकरणात बँकेची ४ कोटी ४६ लाखांची फसवणूकPune Road Accident News : लोणी काळभोरमध्ये ट्रकवर मोटार आदळली; मोटार चालक मृत्युमुखीNavi Peth Crime News : आर्थिक व्यवहारातून तरुणाचा खुनाचा प्रयत्नWarje Crime News : गांजा विक्री करणारी महिला अटकेत

रिपब्लिकन पार्टीच्या राज्य कार्यकारिणीची शनिवारी पुण्यात बैठक

रामदास आठवले यांच्या उपस्थितीत होणार महत्त्वपूर्ण बैठक

marathinews24.com

पुणे – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या महाराष्ट्र राज्य राज्य कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक शनिवार, दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता कॅम्प येथील रेसिडेन्सी क्लब येथे आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती पुण्याचे उपमहापौर तथा पक्षाचे राज्य संघटन सचिव परशुराम वाडेकर यांनी दिली.

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या क्षमतावृद्धीसाठी २ ते ८ एप्रिलदरम्यान ‘महा-साधना सप्ताह’ – सविस्तर बातमी

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशाने व त्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. बैठकीत पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार असून महाड चवदारतळे सत्याग्रह शताब्दी महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच पक्ष नेतृत्वाच्या सूचनेनुसार इतर महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा होणार असल्याचे वाडेकर यांनी सांगितले.

या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, महासचिव अविनाश महातेकर यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीस केंद्रीय व राज्य कार्यकारिणीतील निमंत्रित प्रतिनिधी तसेच महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी  सदस्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बैठक केवळ निमंत्रितांसाठीच असल्याने अनधिकृत व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही, असेही परशुराम वाडेकर यांनी  स्पष्ट केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×