वडगाव खुर्द परिसरातील आर एम सी प्लांट त्वरीत हलवावेत – खासदार मेधा कुलकर्णी

वडगाव खुर्द परिसरातील आर एम सी प्लांट त्वरीत हलवावेत - खासदार मेधा कुलकर्णी

संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून कारवाई करण्याचे आदेश

marathinews24.com

पुणे – वडगाव खुर्द परिसरातील आर एम सी प्लांट चालकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येत आहे. यामुळे प्रदूषण आणि अपघातांची मालिका सुरू असून परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. हे प्लांट्स तातडीने येथून हलवावेत अशी मागणी खासदार डॉ. प्रा. मेधा कुलकर्णी यांनी महापौर आणि महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

वाढदिवशी फुलं नको, ई-कचरा द्या- आमदार हेमंत रासने – सविस्तर बातमी 

खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवारी सिंहगड रस्त्यावरील वडगाव खुर्द दत्तकृष्णाई मंगल कार्यालय ते प्रेयेजासिटी, मधुकोष सोसायटी, धायरी लेन १७ अ फॉर्चुनर सोसायटी परिसरातील अनधिकृत रेडीमिक्स प्लांटची पाहणी केली. कुठलेही नियम न पाळणे, आर एम सी प्लांटमधून होणारे प्रदूषण, रेडिमिक्स वाहून नेणाऱ्या वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी, अशा अनेक गोष्टी निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून कारवाई करण्याचे आदेश दिलें. तसेच महापौर आणि पुणे महापालिकेचे आयुक्त यांनी याबाबत त्वरीत कारवाई करून हे आरएमसी प्लांट बंद करावेत आणि त्यांचे स्थलांतर करावे अशी विनंती केली आहे.

या भागातील अनधिकृत सिमेंट प्लांटमुळे या सर्व परिसरात होणारे अतिघातक प्रदुषण होत आहे. त्यातून निर्माण होणाऱ्या सिमेंटची भुकटी मिसळून या भागातील रहिवाशांच्या घरात येत आहे. त्यामुळे लहान मुले, वृद्ध यांना श्वसनाचा त्रास होतो आहे.

सदरचे रस्त्यावरून सिमेंट प्लांन्टमधून रेडीमिक्सची वाहतुक करणा-या ढंपर, मिक्सर व इतर वाहने यांचे मधून रस्त्यावर खुप रेडीमिक्स सिमेंट पडते व त्यामुळे हवेत सिमेंटचे प्रमाण वाढत आहे. तसेच पडलेल्या सिमेंट वरून दुकाची स्वार यांचे अपघात होतात. या धुळीमुळे दुचाकीवर प्रवास करताना तोडांत, डोळयात धुळ जाते व त्यामुळे श्वसनाचे, डोळयाचे आजाराचे प्रमाण वाढलेले आहे. याबाबत या भागातील रहिवाशी अनेक दिवसांपासून प्रदूषण नियंत्रण महामंडळ, पुणे महापालिका, ट्रॅफिक बाबत पोलिस अधिकारी , या प्रभागाचे नगरसेवक, आमदार यांच्याकडे तक्रार करत आहेत. मात्र, कुणाकडूनही याला दाद मिळत नाही.

सदर रस्त्यावर प्रयेजा सिटी, प्रयेजा पुरम आर्यन रेसिडेन्सी, कल्पवृक्ष व इतर अशा सहकारी संस्था आहेत. त्यामध्ये जवळपास हजार पेक्षा जास्त नागरीक राहातात. सदरचे रस्त्यावर मुळतः नांदेड सिटी मधुकोष व खडकवासला येथून वारजे हिंजवडी मुंबई कडे जाणा-या वाहनांची वाहतुक प्रचंड प्रमाणात आहे. त्यातुन सदरचा रस्ता हा अत्यंत लहान व सदरचे वाहतुकीस आवश्यक एवढा नाही. सदरचे रस्त्यावरून सिमेंट प्लांन्ट मधून येणारी वाहने अत्यंत भरधाव असतात व एक गोष्ट अत्यंत गंभीर आहे की, सदरचे वाहने चालविणारे वाहन चालक हे नेहमी फोनवर बोलत असतात, त्यांचे गाडीमध्ये जोर जोरात आवाजात गाणे लावलेले असतात. त्यामुळे अपघात होवून नागरीकांचे जीवीताचा प्रश्न निर्माण झाला आहे. मध्यंतरी सिमेंट प्लांटकडे जाणाऱ्या रस्त्याच्या वळणावर अगदी बाजूने चालत जात असलेल्या पादचारी महिलेला एका RMC मिक्सर वाहनाने चिरडले. त्यामध्ये त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. याबाबत अनेक वेळा वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. परंतु, कोणीच याची दखल घेत नाही.

शेवटी नागरिकांनी याबाबत मेधा कुलकर्णी यांना याबाबत घालण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांनी आज शनिवारी या संपूर्ण भागाची पाहणी केली त्यावेळी अनेक भयानक गोष्टी समोर आल्या. या भागातील सिमेंट प्लांट हे कुठलेही पर्यावरणाचे नियम पाळत नसल्याचे निदर्शनास आले तसेच या अगोदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे दोन प्लांट बंद करण्यात आले असल्याचे सांगितले. परंतु बाकीचे का का सुरू आहेत याबाबत त्यांना काहीही स्पष्टीकरण दिले नाही. तसेच सिमेंट रेडी मिक्स वाहून येणाऱ्या डंपर मोठ्या वाहनांना नंबर प्लेट नसल्याचे निदर्शनास आले वाहतुकीचे नियम मोडून या वाहनांवर 22 ते 25 हजारांचा दंड असल्याचे यावेळी समोर आले.

या सर्व वाहनांवर आणि त्यांच्या मालकांवर कारवाई करावी तसेच हे आरएमसी बंद करून त्याचे स्थलांतर करावे अशी मागणी त्यांनी केली. याबाबत महापालिका आयुक्तांना कारवाई करण्याबाबत बोलणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

प्रयेजा पुरम सोसायटीचे अध्यक्ष गणेश पिंपळे, सचिव ॲड. प्रितेश चांडगे, पवन मोकाशी,  संतोष कुलकर्णी, राजेंद्र पाटील, शर्मिला नाखारे, निलेश घोडके, शेखर लोहोटे, प्रशांत गोहाड, मनीष वैद्य, गिरीश चोरघे, स्वाती टिळक, मंगला ठाकरे, नंदिनी कुलकर्णी, हरिहर घोडके, वासुदेव गोहाड, प्रयेजा पुरम, प्रयेजा सिटी या सोसायटीमधील नागरिक यावेळी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×