Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

एसएनडीटी मध्ये  महिला दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ पुणे संस्कृती तर्फे प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न

स्त्रियांच्या मनोबल आणि स्वसंरक्षणाविषयी मार्गदर्शन; विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

marathinews24.com

पुणे – आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ पुणे संस्कृती, *एस.एन.डी.टी. कॉलेज ऑफ होम सायन्स, पुणे आणि मानसी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या सन्मानार्थ प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात समाजकार्य व महिला सशक्तीकरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दोन मान्यवर महिलांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

डी.लिट.मुळे स्वयंपूर्ण गोवे उपक्रमाला बळ-मुख्यमंत्री प्रमोद सावंत – सविस्तर बातमी

सत्कारमूर्ती म्हणून प्रा.  शीतल मोरे आणि  शुभदा गोडबोले यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या मानपत्राचे वाचन प्रज्ञा वझे आणि  स्मिता कुलकर्णी यांनी केले.

कार्यक्रमात सीए सर्वेश मेहंदळे यांनी “स्त्रीचे मनोबल आणि सकारात्मकता” या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच नितिन शेलार यांनी मुलींसाठी स्वसंरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत स्वसंरक्षणाच्या तंत्रांचे प्रात्यक्षिक सादर केले. या प्रात्यक्षिकाला उपस्थित विद्यार्थिनी व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या वेळी रोटरी क्लब ऑफ पुणे संस्कृतीचे प्रेसिडेंट रो. मोहन टिलू, सेक्रेटरी रो. स्मिता कुलकर्णी, डिस्ट्रिक्ट डायरेक्टर रो. संतोष परदेशी. तसेच इतर सभासद उपस्थित होते. एस.एन.डी.टी. कॉलेज ऑफ होम सायन्सच्या वतीने प्राचार्य गणेश चव्हाण, प्रा. अनुजा किणीकर व इतर प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते. मानसी फाऊंडेशनच्या वतीने संस्थेच्या अध्यक्ष सौ. मानसी ठाकूर उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुजा भिसे यांनी केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांचे मनोबल वाढवणे, आत्मविश्वास निर्माण करणे आणि स्वसंरक्षणाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवण्याचा संदेश देण्यात आला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×