Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

रॉटव्हीलर कुत्र्याने घेतला अभियंत्याचा चावा हॅण्डलरवर गुन्हा दाखल

रॉटव्हीलर कुत्र्याच्या हल्ल्यात अभियंता जखमी, कुत्र्याच्या मालकावर गुन्हा दाखल

Marathinews24.com

पुणे– जॉगिंग करणाऱ्या अभियंत्याचा रॉटव्हिलर जातीच्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे अभियंत्याच्या हाताला आणि मनगटाला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी कुत्र्याच्या हॅण्डलवर बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अभि (पुर्ण नाव पत्ता नाही) याबाबत सुयोग राऊत (वय ४९ ,रा.पॅनकार्ड कल्ब रोड बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना २३ मार्चला सकाळी सव्वा सात वाजताच्या सुमारास पाषाण परिसरातील विरभद्रनगरकडे जाणार्‍या सर्व्हिस रोडवर घडली आहे.

पाळीव कुत्र्यामुळे मानवी जीवीतास होणार्‍या संभाव्य धोक्यापासून संरक्षण करण्याकरीता पुरेशी उपायोजना न करता कोणतीही खबरदारी न घेता कुत्रा सार्वजनिक ठिकाणी मोकळा सोडल्यामुळे कोणाच्यातरी जिवीतास धोका निर्माण होईल याची जाणीव असताना सुद्धा कुत्र्याला मोकळे सोडून हयगयीचे वर्तन केल्यामुळे त्याने राऊत यांच्यावर हल्ला करून जखमी केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राऊत हे २३ मार्चला पॅनकार्ड क्लबरोडने जॉगिंग करत होते. सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास विरभद्रनगरकडे जाणार्‍या लेनवर असताना, त्यांना पाठीमागून कोणीतरी धावत येत असल्याचा आवाज आला. काही समजण्याच्या अगोदरच कुत्र्याने त्यांच्या अंगावर झेप घेऊन हाताचा पंजा आणि मनगटाचा चावा घेतला. त्यावेळी त्याचा हॅण्डलर पळत आला आणि बेल्ट लावून त्याने कुत्र्याला ताब्यात घेतले. राऊत यांनी खासगी रुग्णालयात धाव घेत उपचार घेतले. त्यानंतर त्यांनी बाणेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी अभि नावाच्या हॅण्डलवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान हा कुत्रा नयनाज इराणी यांचा असल्याचे नमूद केले आहे. पोलिस उपनिरीक्षक शामल पाटील तपास करीत आहेत.

शहरभर पाळीव कुत्र्याची दहशत

शहरभर सकाळच्यावेळी कुत्र्याला फिरवण्यासाठी घेऊन येणारे हॅण्डलर, त्यांचे मालक अनेकदा त्यांना रस्त्याने मोकळे सोडून देतात. कुत्राने मॉर्निंग वॉकच्यावेळी अनेकांना चावा घेतल्याच्या घटना यापुर्वी शहरात घडल्या आहेत. त्यामुळे संबंधित हँडलर विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×