चोरट्यांविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO Cyber Fraud) नावे दंडात्मक कारवाईचे बनावट चलन पाठवून सायबर चोरट्यांनी एकाची तीन लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे.
तर ढोल-ताशा पथकांवरही कारवाई- पोलीस आयुक्त अमितेश कुमार – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मंगळवार पेठेत राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी अनोळखी मोबाइल क्रमांकावरुन तक्रारदाराल आरटीओच्या नावे दंडात्मक कारवाईचे बनावट चलन पाठविले. हे चलन एपीके फाईलच्या माध्यमातून पाठविण्यात आले होते. तक्रादाराचा मोबाइल क्रमांक बँक खात्याला जोडण्यात आला आहे. संबंधित फाईल उघडल्यानंतर चोरट्यांनी तक्रारदाराचा मोबाइल क्रमांकाचा तांत्रिक ताबा (हॅक) RTO Cyber Fraud घेतला. चोरट्यांनी तक्रारदाराच्या बँक खात्यातून तीन लाख चार हजार रुपयांची रोकड काढून घेतली. ऑनलाइन पद्धतीने ही रक्कम दुसऱ्या एका खात्यात जमा करण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुळे तपास करत आहेत.




















