Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली पुरंदर तालुक्यातील पालखीतळांची पाहणी

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली पुरंदर तालुक्यातील पालखीतळांची पाहणी

वारकऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे दिले निर्देश

marathinews24.com

पुणे – ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी आज संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील पालखीतळ आणि पालखी विसाव्यांची पाहणी केली. पालखीतळांवर वारकऱ्यांसाठी पाणी, स्वच्छतागृहे, आरोग्य आदी सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश यावेळी मंत्री  गोरे यांनी दिले. मंत्री गोरे यांनी नीरा विसावा तळापासून सुरुवात करून वाल्हे, जेजुरी, सासवड या पालखी मुक्काम तळांची आणि पिंपरी खुर्द, दौंडज शीव, साकुर्डे, यमाई शिवरी, बोरावके मळा या पालखी विसावा तळांची पाहणी केली.

शहरातील विविध ठिकाणी घरफोडीच्या घटना – सविस्तर बातमी 

यावेळी प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, नीरा येथे सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, सासवड प्रांताधिकारी वर्षा लांडगे खत्री, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, पोलीस उप अधीक्षक तानाजी बर्डे, तहसीलदार विक्रम राजपूत आदी उपस्थित होते.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली पुरंदर तालुक्यातील पालखीतळांची पाहणी

यावेळी मंत्री गोरे म्हणाले, पालखीतळांच्या ठिकाणी प्रत्येक वर्षी त्याच त्याच सुविधांची दुरुस्ती करत राहण्यापेक्षा कायमस्वरूपी सुविधा निर्माण कराव्यात असे मुख्यमंत्री महोदयांचे निर्देश आहेत. त्यानुसार काम करण्याचे नियोजन असून प्रशासनाने प्रस्ताव द्यावेत. नीरा विसावा स्थळ येथील पालखी विसाव्याच्या ठिकाणी काँक्रेटीकरण करणासाठी ५० लाख देण्यात येतील. पालखीपूर्वी हे काम पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी दिले. नीरा नदी स्नानासाठी घाट बांधण्याचा प्रस्ताव द्यावा, अशा सूचनाही प्रशासनाला दिल्या.

यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी रस्ते खराब झालेले आहेत, काही पूल पडले आहेत. त्यांची तातडीने दुरुस्ती करावी. मोठ्या प्रमाणात पावसामुळे वारकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रत्येक पालखीतळावर त्याप्रमाणे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या

वाल्हे पालखीतळ येथून पालखीचे मार्गक्रमण गतीने आणि सुलभपणे व्हावे, यासाठी पालखीतळ ते सुकलवाडी, जीरपवस्ती ते गुळुंचे मार्गे नीरा हा पर्यायी रस्ता व्हावा, अशी मागणी असून त्यानुसार जिल्हा परिषदेने प्रस्ताव करावा. पालखी तळाच्या शेजारच्या लहान रस्त्याच्या साईड पट्ट्या भरून घ्याव्यात. पालखीतळावरील सर्व पोलला सीसीटीव्ही बसवावेत, अशा सूचना दिल्या. यावेळी सरपंच अतुल गायकवाड आदी उपस्थित होते.

जेजुरी येथे पालखीतळ पाहणीप्रसंगी आमदार विजय शिवतारे, राहुल कुल, जेजुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले आदी उपस्थित होते. सासवड येथील पालखीतळाचा यापूर्वीच चांगला विकास करण्यात आल्यामुळे येथे काही अडचण येणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रत्येक पालखी तळाच्या ठिकाणी वारकऱ्यांच्या सोईसाठी ७ लाख ५० हजार चौरस फुटाचा मंडप करण्यात येणार आहे. महिलांसाठी मोठ्या प्रमाणात वेगळी स्नानगृहे उभारण्यात येणार आहे. अनेक पालखी तळांवर पाणी साचते त्याबाबत मार्ग काढण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी द्विवेदी यांनी माहिती दिली की, घाट रस्त्यात पालखी महामार्गाचे काम चालू असल्यामुळे सुरक्षेसाठी सध्याच्या रस्त्याचे बॅरिकेटिंग केले आहे. त्याच बरोबर ठिकठिकाणी स्वच्छता करण्याचे काम सुरू असून दिवे घाटातील कचरा काढण्यात आला आहे.

ग्रामविकास मंत्री यांनी घेतले मल्हारी मार्तंडाचे दर्शन

ग्रामविकास मंत्री गोरे यांनी जेजुरी येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत मल्हारी मार्तंड आणि म्हाळसादेवीचे दर्शन घेऊन अभिषेक व महापूजा केली. तसेच जेजुरी विकास आराखड्यातील कामांची पाहणी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×