Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

गोळीबारात सराइताचा साथीदार जखमी

हडपसरमधील घटनेने खळबळ

marathinews24.com

पुणे – दोन गटातील वादातून कोयता आणि देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन पाठलाग करताना प्रतिस्पर्धी टोळीतील एकावर गोळीबार करताना नेम चुकला. गोळीबारात एक तरुण जखमी झाला. मावस भावाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. हडपसरमधील मांजरी भागात गुरुवारी (दि.२९ ) रात्री गोळीबार झाल्याची घटना घडली.

वादातून मित्राचा कालव्यात ढकलून केला खून – सविस्तर बातमी

वैभव श्रवण गवळी (वय २० रा. हडपसर ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वैभव गवळी याच्यासह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुष्पा कुचेकर (वय ४०) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुमीत खवळे याला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्पा कुचेकर यांचा मुलगा स्वप्नील उर्फ बिट्ट्या कूचेकर आणि सुमीत खवळे यांच्यात वाद आहेत. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास सुमीत खवळे, त्याचा मावसभाऊ वैभव गवळी आणि साथीदारांनी कुचेकर याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दुचाकीवरुन खवळे, गवळी आणि साथीदार कुचेकरचा पाठलाग करत होते. खवळे याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल होते, साथीदारांकडे कोयते होते. दुचाकीस्वार कुचेकरवर खवळेने पिस्तुलातून गोळी झाडली. नेम चुकल्याने गोळी गवळी याच्या खांद्याला चाटून गेली. गोळीबारात गवळी जखमी झाला. दरम्यान, दुचाकीस्वार कुचेकर हा भरधाव वेगात तेथून पसार झाला.

जखमी झालेल्या गवळीला खवळे आणि साथीदारांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. गोळीबाराचा प्रकार असल्याने डाॅक्टरांनी गवळीला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. ससून रुग्णालयाातील डाॅक्टरांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी खवळे आणि गवळी यांची चौकशी केली. चौकशीत प्रतिस्पर्धी टोळीतील एकाला जीवे मारण्याचा प्रयत्नात असताना नेम चुकल्याने गोळी गवळी याच्या खांद्याला चाटून गेल्याची माहिती खवळेने दिली. हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×