Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

पुण्यात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल व्हॅनचा अपघात

पुण्यात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल व्हॅनचा अपघात

बस चालकासह ४ विद्यार्थी जखमी

marathinews24.com

पुणे– विद्यार्थ्यांना शाळेतून घरी घेऊन निघालेल्या स्कूल व्हॅनचा अपघात झाल्याची घटना काळेपडळ परिसरात घडली. चालकाचे नियत्रंण सुटल्याने स्कूल व्हॅन लाईटच्या पोलला जाऊन धडकली. अपघातात बस चालकासह चार विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. गुरूवारी दुपारी दीडच्या सुमारास अपघात झाला. याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात चालक अमोल विनायक बोराटे (रा. काळेपडळ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यात अवकाळी पावसाचा तडाखा, ८२ ठिकाणी झाडपड – सविस्तर बातमी 

पोलिसांच्या माहितीनुसार, साधना विद्यालयाची खासगी विद्यार्थी बस विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. बसचालक अमोल हा विद्यार्थ्यांना घरी सोडण्यास जात होता. व्हॅनमध्ये ३० ते ३५ विद्यार्थी होते. सर्व विद्यार्थी आठवी ते दहावीमधील होते. व्हॅन म्हसोबा चौकात आल्यानंतर अचानक चालकाचे नियत्रंण सुटून बस लाईटच्या पोलला धडकली. त्यात बसचा पुढील भाग तुटला गेला. बसचा स्पीड मोठा असल्याने चालक अमोल याच्यासह तीन ते चार विद्यार्थी जखमी झाले.

नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती देत जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केले. एका विद्यार्थ्याला फॅक्चर झाल्याचे माहिती असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर चालकही जखमी झाला आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी क्रेनच्या मदतीने स्कूल व्हॅन बाजूलाकरून वाहतूक सुरळीत केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×