Breking News
हडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापरपुण्यात दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरफार; २७४ दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई

तोतया पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

पोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाण

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पोलीस असल्याची बतावणी करुन ज्येष्ठ नागरिकाकडील सोनसाखळी चोरट्यांनी लांबविल्याची घटना कात्रज-कोंढवा रस्त्यावर घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी तीन चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

फ्लॅटचे कुलूप तोडून साडेसात लाखांचा ऐवज लांबविला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे कात्रज-कोंढवा रस्त्यावरील माऊलीनगर भागात राहायला आहेत. १० डिसेंबर रोजी सकाळी पावणेअकराच्या सुमारास ते कात्रज-कोंढवा रस्त्याने निघाले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांना अडवले. पाेलीस असल्याची बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली. त्यानंतर चोरट्यांनी भागात ज्येष्ठ नागरिकांकडील दागिने चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, अशी बतावणी चाेरट्यांनी केली.

चोरट्यांकडे वही होती. ज्येष्ठ नागरिकाचे नाव लिहून घेण्याचा बहाणा चोरट्यांनी केला. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना बोलण्यात गुंतविले. ज्येष्ठाकडील सोनसाखळी काढून ठेवण्यास सांगितले. सोनसाखळी रुमाल बांधून देण्याचा बहाणा केला. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांनी ९० हजार रुपयांची सोनसाखळी लांबविली. सोनसाखळी लांबविल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत.
पोलीस असल्याची बतावणी, तसेच ज्येष्ठांना मोफत धान्य, साडी वाटप करण्यात येत असल्याची बतावणी करुन चोरट्यांकडून फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. चोरट्यांच्या बतावणीवर विश्वासठेऊ नये. बतावण करणारे चोरटे आढळून आल्यास त्वरीत पोलिसांकडे तक्रार द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सिंहगड रस्ता, पर्वती, बाणेर परिसरात ज्येष्ठ नागरिकांकडे बतावणी करुन दागिने लांबविण्याच्या घटना घडल्या आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×