Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची सव्वा ३ कोटींची फसवणूक

मोबाईल हॅक करून महिलेला पावणेसहा लाखांचा गंडा

सायबर चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – सायबर चोरट्यांनी दोन ज्येष्ठ नागरिकांना गुन्हे दाखल झाल्याचे सांगत कारवाईची भिती दाखवत तब्बल सव्वा २ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. वानवडी तसेच एरंडवणा भागातील ज्येष्ठांना फसविले आहे.

महादेव मुंडें हत्या प्रकरणात दोघांची नार्को टेस्ट पूर्ण – सविस्तर बातमी 

पहिल्या घटनेत ज्येष्ठ नागरिकाला पोलिसांचा गणवेश परिधान करून बृहन्मुंबई पोलिस दलातील अधिकारी असल्याची बतावणी करत १ कोटी २७ लाख ५३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मनी लॉन्ड्रींगच्या गुन्ह्यात अटकेची भिती दाखवत त्यांच्यावर दबाव टाकून ही रक्कम उकळली गेली. याप्रकरणी ८६ वर्षीय व्यक्तीने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रकार डिसेंबर २०२५ ते २१ जानेवारी २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, वानवडी परिसरात राहण्यास असून, ते घरी एकटेच असतात. दरम्यान, ते व्यावसायिक आहेत. त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून त्यांच्या मोबाईलवर फोन आला. संबंधिताने तक्रारदारांना पोलिस असल्याची बतावणीक केली आणि त्यांना विश्वास बसावा, यासाठी पोलिसांचा गणवेश देखील घातला होता. सायबर चोरट्यांनी त्यांना तुमच्यावर कुलाबा पोलिस ठाण्यात मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात कारवाई तसेच अटक करण्याची भिती दाखवली. त्यांच्यावर अटकेसंदंर्भाने दबाव टाकून त्यांच्याकडून जवळपास एक ते दीड महिन्यात वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यावर तब्बल १ कोटी २७ लाख ५३ हजार रुपये घेत त्यांच्या फसवणूक केली. अधिक तपास पोलिस करत आहेत.

दुसऱ्या घटनेत एरंडवणे येथील ज्येष्ठ नागरिकाला पीएफआय (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) संघटनेच्या संपर्कात असल्याचे सांगत तब्बल २ कोटी १ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी ७० वर्षीय ज्येष्ठाने सायबर पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानूसार, मोबाईल धारक व बँक खातेधारकांवर गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, राहुल रॉय पसर्नल डेटा प्रोटेक्शन ऑफ इंडिया अंधेरी वेस्ट येथून बोलत असल्याचे सांगितले. तसेच, त्यांना तुमच्या मोबाईलवरून अश्लील फोटो व व्हिडीओ टाकल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला असल्याची बतावणी केली. तर तक्रारदारांना ते पीएफआय (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) संघटनेशी संपर्कात असून, तुमच्या नंबरवरून दीड कोटींचा फ्रॉड झाला आहे, अशी बतावणी केली. तसेच, त्यांना व पत्नीला प्रेशरमध्ये ठेवत २ कोटी १ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×