Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठाची फसवणूक

Pune Crime News : श्वान मालक महिलेच्या अंगावर मोटार घालून खुनाचा प्रयत्न

टिळक रस्त्यावरील घटना

marathinews24.com

पुणे – एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाकडे बतावणी करुन चोरट्याने खात्यातून ८० हजार रुपयांची रोकड लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला. टिळक रस्ता परिसरात ही घटना घडली.याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा गजाआड – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार गुरुवार पेठेत राहायला आहेत. ते २२ जुलै रोजी टिळक रस्त्यावरील एका बँकेतील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांच्या पाठोपाठ चोरटा एटीएममध्ये शिरला. चोरट्याने मदतीचा बहाणा केला. ज्येष्ठाकडील डेबिट कार्ड, तसेच सांकेतिक शब्द चोरट्याने घेतला. एटीएममधून पैसे काढण्याचा बहाणा करुताना चोरट्याने त्याच्याकडील डेबिट कार्ड वापरले. त्यामुळे पैसे बाहेर आले नाहीत. एटीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची बतावणी चोरट्याने केली. त्यानंतर चोरट्याने त्याच्याकडील डेबिट कार्ड ज्येष्ठाला दिले.ज्येष्ठाचा डेबिट कार्डचा गैरवापर करुन चोरट्याने ज्येष्ठाच्या खात्यातून ८० हजार रुपये काढून घेतले. खात्यातून पैसे काढून घेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर ज्येष्ठाने पोलिसांकडे तक्रार दिली.

पोलिसांनी एटीएम परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले असून, पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ तपास करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून एटीएमधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांकडे मदतीचा बहाणा करुन त्यांच्या खात्यातून रोकड लांबविण्याच्या घटना घडल्या आहेत. खडकी, वारजे, तसेच सोमवार पेठ भागात अशा प्रकारच्या घटना घडल्या होत्या. पोलिसांनी याप्रकरणी तपास करुन उत्तर प्रदेशातील चोरट्यांना अटक केली होती.

वैमनस्यातून तरुणाचा खुनाचा प्रयत्न, ५ जणांविरुद्ध गुन्हा

पुणे – वैमनस्यातून तरुणावर हल्ला करुन त्याच्या डोक्यात गज घालण्यात आला. हडपसर-सासवड रस्त्यावरील वडकी नाला भागात ही घटना घडली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांकडून पाच जणांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. विकी सुरेश खोमणे (वय ३८, रा. माळेगाव बुद्रुक, ता. बारामती)असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ऋषिकेश हनुमंत चव्हाण (वय ३२, रा. अंजनगाव, ता. बारामती), मयुर संजय चव्हाण (वय ३०, रा. लक्ष्मीनगर, बारामती), तेजस तानाजी खंडाळे (रा. लखडेनगर, माळेगाव, ता. बारामती), सुरज बाबजी खोमणे (रा. माळेगाव खुर्द),अक्षय ऊर्फ गोटूु छगन माकर (रा. माळेगाव खुर्द, ता. बारामती) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. खोमणे याने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकी खोमणे मजुरी करतो. आरोपी आणि खोमणे यांच्यात २०११ मध्ये वाद झाला होता. त्या वेळी त्यांनी एकमेकांविरुद्ध परस्परविरोधी फिर्याद दिली होती. २०१७ मध्ये त्यांच्यातील वाद मिटले. आरोपी चव्हाण, खंडाळे, खोमणे, माकर यांच्याविरुद्ध यापूर्वी गुन्हे दाखल झाले आहेत. १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास खोमणे सासवड रस्त्यावरील वडकी नाला भागात थांबला होता. त्या वेळी आरोपींनी त्याला शिवीगाळ करुन मारहाण केली. त्याच्या डोक्यात दगड घातला, तसेच गज मारला. गंभीर जखमी झालेल्या खोमणे याने रुग्णालयात उपचार घेतले. खोमणेने नुकतीच फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल मोरे यांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×