Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

शेअर ट्रेडींगच्या बहाण्याने जेष्ठाला गंडा

शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष पडले महागात

सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी करीत सायबर चोरट्यांनी जेष्ठ नागरिकाला ५ लाख ६३ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १ जून २०२२ ते ऑगस्ट २०२५ मध्ये कर्वेनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी ६८ वर्षीय नागरिकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, बँक खातेधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कर्वेनगरमध्ये राहायला असून, १ जून २०२२ मध्ये सायबर चोरट्यांनी त्यांना संपर्क केला होता. शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी केली. त्यांचा विश्वास संपादित केल्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांना रक्कम ऑनलाईनरित्या वर्ग करण्यास भाग पाडले. १८ मार्च २०२५ पर्यंत सायबर चोरट्यांनी त्यांच्याकडून ५ लाख ६३ हजार रूपये वर्ग करून घेत फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संगीता देवकाते तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×