Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

Seva Sankalp Abhiyan Pune : पुणे जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध उपक्रम

Seva Sankalp Abhiyan Pune

चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा व राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारांचे वितरण

marathinews24.com

पुणे – Seva Sankalp Abhiyan Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घटनात्मक पदावरील कारकिर्दीची २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘सेवा परमो धर्मः’ या संकल्पनेवर आधारित सेवा संकल्प अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यात सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामार्फत १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात आले. अभियानांतर्गत रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, आरोग्य तपासणी, योग व ध्यान सत्र, सायबर सुरक्षा आणि व्यसनमुक्ती जनजागृती, मतदार नोंदणी, शासकीय योजनांची माहिती तसेच अनाथालय व वृद्धाश्रमांना भेटी हे उपक्रम आयोजित करण्यात आले. यामध्ये समाज कल्याण विभागाचे अधिकारी-कर्मचारी, वसतिगृह व निवासी शाळांचे शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी झाले.

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या दौऱ्याने भाजप-महायुतीच्या प्रचाराला नवी ऊर्जा; कार्यकर्त्यांमध्ये विजयाचा विश्वास – सविस्तर बातमी 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे जिल्हास्तरीय चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडल्या. वक्तृत्व स्पर्धेत गट अ मध्ये यशराज निखील दहींजे, गट ब मध्ये प्रणाली दादा कांबळे आणि गट क मध्ये शितल गोकुळ तायडे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. (Seva Sankalp Abhiyan Pune) चित्रकला स्पर्धेत गट अ मध्ये संतोष शिवराया डोंगरे, गट ब मध्ये ऐश्वर्या विनायक कांबळे आणि गट क मध्ये अंजली सुग्रीव बडे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. यावेळी राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले.

समाज कल्याण विभागाच्या विशेष अधिकारी माधुरी वाघमोडे यांनी केली. सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धांसाठी तयारी करण्याचे आवाहन केले. तसेच गुणवत्ता पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती कायम राखावी, असे सांगितले. यावेळी समाज कल्याण विभागाचे अधिकारी कर्मचारी, वसतिगृहांचे गृहप्रमुख व गृहपाल, निवासी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, बार्टीचे प्रकल्प अधिकारी, समतादूत आणि विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×