Breking News
गाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलेपरदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्रीब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हातपुण्यात चार घरफोड्या; ८ लाखांचा ऐवज चोरलाराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू

शारदेश मंगलम् विवाह सोहळा संपन्न; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट

गणरायाचे दर्शन व्हावे, याकरिता भाविकांनी पहाटेपासून रांगा

marathinews24.com

पुणे – सनई व मंगलाष्टकांचे स्वर… लग्नसोहळ्यासाठी सजलेला मंडप आणि शुभमंगल सावधान च्या मंगल स्वरांत मंदिरात श्री गणेश आणि देवी शारदा यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. याच दिवशी गणरायाचे दर्शन व्हावे, याकरिता भाविकांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या.

महात्मा फुले आणि महामानव डॉ. आंबेडकर यांच्या प्रेरणेने हे वर्ष सामाजिक सुधारणांचे वर्ष ठरावे: परशुराम वाडेकर – सविस्तर बातमी

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात गाणपत्य सांप्रदायातील परंपरेनुसार विवाह सोहळ्याचे आयोजन देखील केले जाते. दुपारी १२ वाजून ४७ मिनिटांनी भगवान श्री गणेश आणि देवी शारदा यांचा विवाह म्हणजेच शारदेश मंगलम् सोहळा थाटात पार पडला. संकेत मते यांसह तुषार रायकर यांनी सपत्नीक पूजन केले. रात्री भारतीय वारकरी महिला मंडळाच्यावतीने उटीचे भजन देखील आयोजित करण्यात आले होते.

ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, श्री गणेशांच्या दोन शक्तींना गाणपत्य संप्रदायात देवी सिद्धी आणि देवी बुद्धी या नावाने आळविले जाते. भगवंताच्या क्रियाशक्तीला देवी सिद्धी असे म्हणतात, तर भगवंताच्या ज्ञानशक्तीला देवी बुद्धी असे म्हणतात. अश्विन महिन्यामध्ये शरद ऋतू असल्याने या काळात प्रगट झालेल्या देवी बुद्धीला शारदा असे म्हणतात. शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे तिची उज्ज्वलता, आल्हाददायकता असल्याने तिला शारदा असे म्हणतात. शरद ऋतू मधील प्रसन्नतेप्रमाणे देवी बुद्धीने प्रसन्नता प्राप्त होत असल्याने तिला शारदा असे म्हणतात. अशा देवी शारदेचा भगवान श्री गणेशांसोबतच्या महामीलनाचा सोहळा म्हणजे श्री शारदेश मंगलम आहे.

मंदिरात रविवारी पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक झाला. त्यानंतर पहाटे ४ वाजता गायिका विदुषी मंजुषा पाटील यांनी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण केली. सकाळी ८ वाजता गणेशयाग देखील झाला. आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्णांना, श्रीवत्समधील मुलांना तसेच वृद्धाश्रम व दिव्यांग मुलांच्या संस्था व मंदिरात भाविकांना देण्यात येणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×