Breking News
Pune Bank Fraud Case : नियमबाह्य कर्ज प्रकरणात बँकेची ४ कोटी ४६ लाखांची फसवणूकPune Road Accident News : लोणी काळभोरमध्ये ट्रकवर मोटार आदळली; मोटार चालक मृत्युमुखीNavi Peth Crime News : आर्थिक व्यवहारातून तरुणाचा खुनाचा प्रयत्नWarje Crime News : गांजा विक्री करणारी महिला अटकेतMaharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवले

खेळाडूंच्या पदयात्रेने पुण्यात शिवजयंती साजरी

खेळाडूंच्या पदयात्रेने पुण्यात शिवजयंती साजरी

‘मेरा युवा भारत” पदयात्रेत खेळाडूंच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात जयंती साजरी

marathinews24.com

पुणे – जिल्हा प्रशासन, क्रीडा विभाग आणि पुणे महानगरपालिका यांच्या समन्वयाने पुण्यात शिवजयंती ‘मेरा युवा भारत” पदयात्रेत खेळाडूंच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून पदयात्रेचा शनिवार वाडा येथून शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपमहापौर परशुराम वाडेकर, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, शिक्षण उपायुक्त वसुंधरा बारवे, मनपा उपायुक्त संदीप खलाटे, जिल्हा प्रशासनाच्या वतीने तहसीलदार स्मिता माने,अर्जुन पुरस्कार प्राप्त काका पवार, भारतीय खो खो संघाचे कर्णधार प्रतीक वायकर, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सहसचिव शैलेश टिळक, लेखक संजय दुधाणे शिक्षण, पर्यटन, क्रीडा, आरोग्य व पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांचे पुस्तक देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

पुण्यातील दिव्यांग बांधवांना मिळणार कृत्रिम अवयव – सविस्तर बातमी 

महापौर श्रीमती नागपुरे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण अंगीकारले पाहिजेत. शिवजयंती ही औपचारिक मिरवणूक न राहता ती तरुण पिढीला महाराजांच्या विचारांशी जोडणारी, सगळ्यांमध्ये सांघिक भावना निर्माण करणारी ठरावी. आपले सण- परंपरा सर्वांनी एकत्र येऊन साजरे केले पाहिजेत. सर्व महानुभाव, युगपुरुषांच्या जयंती एकत्र येऊन साजरे करुया सर्वांमध्ये सांघिक भावना निर्माण होऊन शिवरायांचे विचार आचरणात यावेत, असा संकल्प यानिमित्ताने करुया, असे त्या म्हणाल्या.

युवा पिढीने थोरा मोठ्यांचा वारसा जतन करावा, तरुण पिढीमध्ये ऊर्जा नवसंकल्पना जागृत करण्याच्या उद्देशाने या पदयात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे श्री. लकडे यांनी प्रास्ताविकात सांगितले. सूत्रसंचालन संदिप घोलप केले तर आभार शिवाजी कोळी यांनी मानले.

या पदयात्रेचा शनिवार वाडा येथून शुभारंभ होऊन एस एस पी एम शाळेजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात आणि जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

पदयात्रेत पारंपरिक वेशभूषेत राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण, व्यवसाय शिक्षण, सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या २ हजार विद्यार्थी- विद्यार्थीनी सहभाग घेतला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×