लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार्या तरूणाचा प्रताप
marathinews24.com
पुणे – लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार्या एका तरूणाने आपल्या सहकारी तरूणीसोबत सेक्स करतानाचे व्हिडिओ आणि फोटो मित्रांना पाठविल्याचा धक्कादायक प्रकार ४ मे ला घडला आहे. याप्रकरणी संबंधित तरूणाविरूद्ध भारतीय न्याय संहिता ७४, ७७, आयटी अॅक्ट ६७ नुसार (गुन्हा क्रमांक २३३/२०२५) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदेश शशिकांत शिरसाट (वय २४ रा. मानोरा गाव, वाशिम) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. दरम्यान, घटनेमुळे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार्या तरूण-तरूणींच्या विश्वासार्हतेबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
शेअरच्या बदल्यात दिला थोडा नफा, नंतर २६ लाखांचा घातला गंडा – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरूणी आणि आरोपी आदेश शिरसाट यांच्यात काही महिन्यांपुर्वी मैत्री झाली होती. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर दोघांच्याही कुटूंबियाच्या संमतीने त्यांनी लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते लिव्ह इनमध्ये राहत असताना दोघांत शाररिक संबंध प्रस्थापित झाले होते. त्यावेळी आरोपी आदेशने सेक्सचे व्हिडिओ रेकॉडिंगसह अर्धनग्न अवस्थेतील फोटो काढले होते. त्यानंतर त्याने काही दिवसांनी संबंधित सेक्सचे व्हिडिओ, फोटो हे त्याचे मित्र देवा, विशाल यांच्या मोबाइल क्रमांकावर पाठविले. इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा गैरवापर करून आरोपीने पीडितेच्या मनास लज्जा उत्पन्न केली आहे.याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक माळी तपास करीत आहेत.
तरूणीचे नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी
तरूणीचे अर्धनग्न फोटो व्हायरल करण्यासह तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाविरूद्ध मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ९ एप्रिल ते ३ मे कालावधीत घडली असून, याप्रकरणी समीर विजय भालेराव (रा. कात्रज) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याने पीडितेला व्हॉटसअॅपद्वारे कॉल करून माझ्यासोबत रिलेशनमध्ये राहा, असे म्हणत शिवीगाळ केली. तरूणीचे पुर्वीचे अर्धनग्न फोटो तिलाच पाठवून व्हायरल करण्याची धमकी दिली. खासगीतील अंतवस्त्रातील फोटो, नग्न फोटो मित्रांना पाठविण्याची धमकी दिली. त्यासोबत ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याचे सांगत कायमस्वरूपी सोबत राहण्यासाठी भालेरावने तिला धमकाविले आहे.
ऑफिसला चाललेल्या तरूणीचा हडपसरमध्ये विनयभंग
रस्त्याने पायी चाललेल्या तरूणीचा पाठलाग करून दुचाकीस्वाराने तरूणीचा विनयभंग केला आहे. तिला पाठीमागून जवळ जाउन धरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तरूणीने आरडाओरड केल्यानंतर दुचाकीस्वार आरोपीने पुन्हा माघारी येउन तरूणीची छेडछाड करीत विनयभंग केला आहे. ही घटना ५ मे रोजी हडपसरमध्ये घडली आहे. याप्रकरणी ३२ ते ३५ वयोगटातील दुचाकीस्वार आरोपीविरूद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपीचा माग काढला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, नराधमांकडून अशारितीने महिलांचा पाठलाग करीत विनयभंग केल्याच्या घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.