Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

श्री महागणपती मंदिर, रांजणगाव जतन व दुरुस्ती कामांसाठी १५ एप्रिल ते ३१ जुलैपर्यंत बंद

जतन-संवर्धन कामांमुळे भाविकांना प्रत्यक्ष दर्शन बंद; नित्य पूजा मात्र सुरू राहणार

marathinews24.com

पुणे – अष्टविनायक आराखड्याअंतर्गत महाराष्ट्र शासनाने मंदिरांच्या जतन व संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून दिला असून, पुरातत्त्व विभागामार्फत विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याच अनुषंगाने श्री महागणपती मंदिर, रांजणगाव येथे सुरू असलेल्या जतन व दुरुस्ती कामांमुळे सदर मंदिर दिनांक १५ एप्रिल २०२६ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

एआयच्या साहाय्याने शेतीला नवी दिशा; सध्या प्रयोगशील आणि आधुनिक शेतीची गरज; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे – सविस्तर बातमी

मागील तीन महिन्यांपासून मंदिरातील मुख्य रचना तसेच परिसरातील जतन, दुरुस्ती व संवर्धनाची कामे प्रगतीपथावर आहेत. या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीने मंदिर तात्पुरते बंद ठेवण्याचा ठराव घेतला असून, सहाय्यक धर्मादाय आयुक्त, पुणे विभाग यांनीही त्यास मान्यता देत संबंधित आदेश जारी केले आहेत.

या कालावधीत मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी श्री महागणपती यांची नित्य पूजाअर्चा, अभिषेक व इतर धार्मिक विधी नियमानुसार सुरू राहणार आहेत. मात्र, भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश किंवा प्रत्यक्ष दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार नाही. तसेच बांधकाम यंत्रणा, अधिकृत अधिकारी-कर्मचारी व विश्वस्त यांच्याशिवाय इतर कोणालाही मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.

श्री महागणपती मंदिर, रांजणगाव येथील विकासकामे ही दीर्घकालीन सुरक्षितता, सुविधा आणि भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक असल्याने ही कामे नियोजनबद्ध व वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी मंदिर तात्पुरते बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे भाविकांनी व स्थानिक नागरिकांनी या कामांचे महत्त्व लक्षात घेऊन मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक तसेच रांजणगाव देवस्थान विश्वस्तांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×