Breking News
Pune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूकPune Crime News : पैसे परत मागितल्याने तरुणावर कोयत्याने वारPune Bank Loan Fraud : जय भवानी सहकारी बँकेत साडेचार कोटींचा कर्ज घोटाळा

कौशल्याच्या संधी: रोजगाराच्या हमी – विशेष लेख

कौशल्याच्या संधी: रोजगाराच्या हमी - विशेष लेख

प्रशिक्षणामुळे बदललेले अक्षदाचे जीवन

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्रातील ग्रामीण भागाकडून शहरांकडे होणारे स्थलांतराचे प्रमाण कमी व्हावे, यास्तव ग्रामीण भागातील युवकांना स्थानिक ठिकाणी कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनविण्याच्या उद्देशाने प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र ही योजना राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील तरुणांना आधुनिक कौशल्य प्रशिक्षण देणे, रोजगार व उद्योजकता वाढवणे, स्थानीय उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

महाराष्ट्रात ‘अँटी लँड ग्रॅबिंग कायदा’ लागू नागरीक सोशल फाउंडेशनची  करण्याची मागणी – सविस्तर बातमी 

या योजनेअंतर्गत कौशल्य विकासाचे उमेदवारांना ३ ते ६ महिन्याचे अल्प मुदतीचे मोफत प्रशिक्षण देण्यात येते. यामध्ये डिजीटल मित्र, मेडीकल रेकार्ड असिटंट, इलेक्ट्रेशियन, जुनियर ज्वलेरी डिझायनर, वेब डेव्हलव्पर, सोशियल मिडीया इन्फ्लयूंसर आदीबाबत प्रशिक्षण देण्यात येते.

या प्रशिक्षणाकरिता उमेदवारांचे शैक्षणिक पात्र १० वी १२ वी, पदविका, पदवी (प्रत्येक अभ्यासक्रमनिहाय वेगवेगळी असेल). १८ ते ४५ युवक-युवतींसाठी वयोगटातील उमेदवार असावे. आधारकार्ड, शैक्षणिक पात्रतेनुसार प्रमाणपत्रांची आवश्यकता आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर शासनामार्फत प्रमाणपत्र देण्यात येते तसेच व्यवसाय करण्यासाठी उमेदवारांना प्रमाणपत्राच्या बँकेकडून कर्ज मिळते. कौशल्य विकास प्रशिक्षण संबंधित सर्व बाबी https://kaushalya.mahaswayam.gov.in/ या वेबसाईटवर ऑनलाईन उपलब्ध आहेत, तसेच अधिक माहितीसाठी या कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक ०२०-२६१३३६०६ वर संपर्क साधावा.

प्रशिक्षणामुळे बदललेले अक्षदाचे जीवन

ग्रामीण भागातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना स्वावलंबी बनविणे ही आजच्या काळातील अत्यंत गरजेची बाब आहे. आर्थिक अडचणी, अपुरी कौशल्ये आणि मर्यादित संधी यामुळे अनेक तरुणांना आपल्या क्षमतेनुसार प्रगती करता येत नाही. अशा परिस्थितीत शासनाच्या विविध कौशल्य विकास योजनांमुळे ग्रामीण युवकांना नवे आयाम मिळत आहेत. प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र ही योजना त्यापैकी एक महत्त्वपूर्ण उपक्रम असून, मोफत प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवकांना रोजगारक्षम बनविण्याचे काम करते. या योजनेचा लाभ घेत आळेफाटा येथील अक्षदा प्रितम मोढवे हिने आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणला असून तिची यशोगाथा इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

आळेफाटा येथील अक्षदा प्रितम मोढवे हिच्या जीवनात प्रशिक्षणापूर्वी विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्याचे पतीही पेट्रोल पंपांवर मजुर म्हणून काम करीत होते. त्यामुळे उत्पन्न मर्यादित असल्याने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखिची होती, कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी ते धडपड होते. अशातच प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राअंतर्गत आस्था फाउंडेशनमार्फत जनरल ड्युटी असिस्टंट (जीडीए) अभ्यापसक्रमासाठी देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणात तिला मूलभूत नर्सिंग कौशल्ये, रुग्णांची काळजी, रुग्णालयीन शिस्त, कक्षाचे व्यवस्थापनाचे उत्तम मार्गदर्शन मिळाले. प्रशिक्षण उत्तीर्ण झाल्यानंतर आस्था फाउंडेशनने तिला सिग्मा कर्करोग रुग्णालयात नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. तिची मेहनत आणि चिकाटीने ती लवकरच कामामध्ये स्थिरावली.

प्रशिक्षणाने तिच्या आयुष्यात परिवर्तन होण्यास सुरुवात झाली, सहा महिने होताच तिची परिस्थिती सुधारु लागली.आज तिला महिन्याला १५ रुपये पगार मिळतो आणि तिचे पतीही पुणे शहरात टॅक्सी चालवून ते आपल्या कुटुंबाचे सक्षमपणे उदरनिर्वाह करीत आहेत. तसेच सद्या मोढवे ही जीएनएम अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन पुढील शिक्षण पूर्ण करीत जाहे.

सुरेश वराडे, सहायक आयुक्त,जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे माध्यमातून जिल्हा कार्यालयामार्फत विविध कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम, कार्य प्रशिक्षण योजना जसे की मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण व प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना व रोजगार मेळावे या योजना निशुल्क राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त रोजगार इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास प्रशिक्षण, कार्य प्रशिक्षण व रोजगार मेळावे या विविध योजनांचा लाभ घ्यावा.

अक्षदा प्रितम मोढवे : जीडीए प्रशिक्षणामुळे माझ्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. मी आज स्वतंत्रपणे काम करीत असून माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. माझे कुटुंब सुरक्षित आहे. प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राअंतर्गत आस्था फाउंडेशनने दिलेल्या संधीमुळे आमचे आयुष्य खरोखर बदलले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×