Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

स्कायडायव्हर शीतल महाजन यांनी दिल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीना शुभेच्छा

स्कायडायव्हर शीतल महाजन यांनी दिल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीना शुभेच्छा

स्पेनमध्ये स्कायडायव्हिंग करून दिल्या अनोख्या शुभेच्छा

marathinews24.com

मुंबई – आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्यातनाम भारतीय स्कायडायव्हर व पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या शीतल महाजन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आकाशातून ऐतिहासिक शुभेच्छा संदेश दिला. नीता अंबानी यांच्या रिलायन्स फाउंडेशनच्या सहकाऱ्याने शीतल महाजन यांनी जगातील सर्वांत उंच ठिकाणी माऊंट एव्हरेस्ट समोर कालापत्थर येथे पॅराशूट लँडिंगचे जागतिक रेकॉर्ड केले आहे.

डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते होणार लाईमलाईट प्रादेशिक’ पुस्तकाचे प्रकाशन – सविस्तर बातमी 

महाजन यांनी युरोपमधील प्रसिद्ध स्कायडायव्हिंग केंद्र स्कायडाईव्ह एम्पुरियाब्रावा (स्पेन) येथे उडी घेतली. या विशेष स्कायडायव्ह दरम्यान त्यांनी ८x६ फूट आकाराचा ध्वज बॅनर प्रदर्शित केला, ज्यावर माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना ७५ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. असा संदेश लिहला होता.

शीतल महाजन म्हणाल्या, पंतप्रधानांना त्यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आकाशातून देणे माझ्यासाठी अभिमानाची आणि सन्मानाची गोष्ट आहे. स्कायडायव्हिंग नेहमीच धैर्य आणि दृढनिश्चयाचे प्रतीक राहिले आहे आणि आजची ही विशेष उडी मी मोदी जींच्या राष्ट्रासाठी केलेल्या कार्याला आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाला समर्पित करते. ही ऐतिहासिक स्कायडायव्ह केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा सन्मान वाढवणारी ठरत नाही तर “आझादीचा अमृतकाल” या काळात भारतीय महिला शक्तीच्या धैर्य, जिद्द आणि यशाचे प्रतीक ठरते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×