Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

छात्रों की गुंज’ कार्यक्रमस्थळी घोषणाबाजी

काँग्रेस, अभाविप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

marathinews24.com

पुणे – लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमापूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांकडून शुक्रवारी (दि. २१) सायंकाळी कार्यक्रमस्थळी घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेस आणि अभाविपचे कार्यकर्ते समाेरासमोर आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप करीत घोषणाबाजी केली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ज्ञानशिल्पाचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण – सविस्तर बातमी

खासदार राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रम शनिवारी ( दि. २२ ) एसएसपीएमपीएस प्रशालेच्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शुक्रवारी (२१ ऑगस्ट) सायंकाळपासून या भागातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली. अभाविपचे कार्यकर्ते शुक्रवारी सायंकाळनंतर एसएसपीएमएस प्रशालेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जमले. कार्यक्रमाच्या तयारीसाठी काँग्रेस कार्यकर्ते तेथे उपस्थित होते. त्यावेळी ‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांनी मुख्य प्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी केली. काँग्रेस आणि अभाविपचे कार्यकर्ते समाेरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केल्याची माहिती मिळाल्यानंतर बंडगार्डन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×